कल्याण लोकसभा मतदारसंघावर हक्क कुणाचा? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या नेत्यांनी दावा केला. त्यावरून सुरू झालेल्या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis on Kalyan Lok Sabha : भाजप-शिवसेना युतीचे संबंध ज्या जागेवरून ताणले गेले, त्या जागेबद्दल आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. ठाण्यातील भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिनिधीत्व करत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावरच दावा ठोकला. यामुळे श्रीकांत शिंदेंही आक्रमक झाल्याचं दिसलं. ही जागा कुणाची यावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली. इंडियन एक्स्प्रेस दैनिका दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी भाजपची भूमिका मांडली आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातच भाजप-शिवसेना युतीचे संबंध कमालीचे ताणले गेल्याचे समोर आले. भाजपच्या मंत्र्यांपासून स्थानिक नेत्यांनी श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर आणि ठाणे मतदारसंघावरही दावा केला. भाजपच्या नेत्यांकडून केल्या गेलेल्या दाव्यांमुळे श्रीकांत शिंदे कमालीचे अस्वस्थ झाल्याचे दिसले. त्यांची ही अस्वस्थता त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातूनही मांडली होती.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचा वाद, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
ठाणे जिल्ह्यात भाजप-शिवसेना नेते एकमेकांना डिवचत असताना देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाबद्दल मोठं विधान केलं आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Ravindra Chavan : “एकनाथ शिंदेंच्या बंडाचं भाजपने दिल्लीत केले प्लानिंग, फडणवीस होते…”
कल्याण लोकसभा मतदारसंघावरून श्रीकांत शिंदे आणि भाजपचे नेते यांच्या जोरदार कलगीतुरा सुरू आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कल्याण लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे आहे आणि शिवसेनाच ही जागा लढेल.”
भाजपच्या नेत्यांनी दिला होता इशारा
भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा जूनच्या आठवड्यात पार पडला होता. या मेळाव्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव भाजपनं मंजूर केला होता. त्यावरूनच श्रीकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती.
ADVERTISEMENT
श्रीकांत शिंदेंनी दिला होता राजीनामा देण्याचा इशारा
भाजप नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे श्रीकांत शिंदे यांनी टीका केली होती. “मला वाटतं कुठल्यातरी शुल्लक कारणावरून, वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे ठराव करतात की शिवसेनेला सहकार्य करायचं नाही. त्याचबरोबर कल्याण लोकसभेचा उमेदवार आम्हीच ठरवू, मला वाटतं ही आव्हानं खुप विचारपूर्वक दिलं पाहिजे”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> अटलजींचा फोन, शिवसेनेचे 40-50 खासदार; संजय राऊतांनी सांगितला 1992 चा किस्सा
पुढे श्रीकांत शिंदेंनी असंही सांगितलं होतं की, “मला जर उद्या सांगितलं की, कल्याण लोकसभेचा राजीनामा द्या, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. मी पक्ष आणि युतीचं काम करायला तयार आहे. पक्षनेतृत्वाने असो वा भाजपने सांगितलं की, कल्याणमध्ये चांगला उमेदवार मिळतोय, तर त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही जसं काम कराल, तसंच मी काम करेन.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT