Kirit Somaiya : ‘महिलांना फोन करून…’, सोमय्यांच्या व्हिडीओवर अनिल परबांनी काय सांगितलं?
किरीट सोमय्या यांच्या समोर आलेल्या व्हिडीओचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आठ तासांच्या क्लिप्स असल्याचा दावा करत एक पेन ड्राईव्ह विधान परिषदेच्या सभापतींकडे सुपूर्द केला.
ADVERTISEMENT
Kirit Somaiya Video : किरीट सोमय्या यांच्या समोर आलेल्या व्हिडीओचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आठ तासांच्या क्लिप्स असल्याचा दावा करत एक पेन ड्राईव्ह विधान परिषदेच्या सभापतींकडे सुपूर्द केला. त्यानंतर शिवसेनेचे (युबीटी) आमदार अनिल परब यांनी किरीट सोमय्यांबरोबरच भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवरही हल्ला चढवला.
ADVERTISEMENT
किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणावर अनिल परब म्हणाले, “एक अभूतपूर्व परिस्थिती आणि त्याबाबतीतले खालच्या सभागृहात खूप बॉम्ब फुटले. आज हा पेन ड्राईव्ह बॉम्ब वरच्या सभागृहात आलेला आहे. काल (17 जुलै) भाजपच्या एका माजी खासदाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. अंबादास दानवे यांनी सांगितलं की कुणाच्याही राजकीय आयुष्यात बदनामामुळे त्याचं राजकीय उद्ध्वस्त झालं, तर तो राजकारणाचा एक भाग आहे. परंतु एखाद्याचं खासगी आयुष्य उद्ध्वस्त होतं. एखाद्याच्या कुटुंबावर ज्यावेळी प्रसंग येतो, याचे आम्ही त्रस्त आहोत. आम्ही हे अनुभवलंय.”
अडीच वर्षांची भरपाई कोण करणार?
– “एखाद्या माणसावर ज्यावेळी खोटे आरोप होतात… दादा (चंद्रकांत पाटील) तुम्ही पार्टी विथ डिफरन्स लोक बसलेले आहात. तुम्हालाही मुलं बाळं आहेत. जेव्हा तुमच्या मुलांना यंत्रणेसमोर उभं केलं जातं. यंत्रणांचे लोक घाणेरडे प्रश्न विचारतात. आज भुजबळ इथे बसले आहेत. अडीच वर्ष तुरुंगात काढली आहेत. कोर्टाने निदोर्ष सोडलंय नंतर… पण त्या अडीच वर्षांची भरपाई कोण करणार? म्हणून हा प्रश्न चर्चेला येणं गरजेचं आहे.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वाचा >> Kirit Somaiya यांच्या आक्षेपार्ह Video प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची सभागृहात ‘ती’ मोठी घोषणा
– “हा प्रश्न किरीट सोमय्या किंवा तुमचा-माझा नाहीये. हा प्रश्न राजकीय जीवनात काम करणाऱ्या एका माणसाचा आहे. ज्याने आपलं राजकीय आयुष्य पणाला लावून तुमच्यापैकी आणि आमच्यापैकी राजकीय कार्यकर्त्याला… इथे आलेले सगळे प्रचंड कष्टाने आले आहेत. कष्ट केले, लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत. जेव्हा तुम्ही करिअर करता आणि त्या करिअरवर ज्यावेळी आघात होतो. बदनामी केले जाते. त्या बदनामीची उत्तरं इथेच दिली पाहिजे. म्हणून हे सभागृह आहे. हे सभागृह कशासाठी आहे. न्याय मिळावा म्हणूनच हे सभागृह आहे. कुणाची राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये.”
व्हिडीओमध्ये दिसणारी ती महिला कोण?
– “आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं, पण गेल्या काही वर्षात… काल ज्या खासदाराचा व्हिडीओ व्हायरल झालाय, याने कित्येक जणांची आयुष्ये उद्ध्वस्त केली आहेत. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं अशी आमची इच्छा नाहीये. परंतू काल जो व्हिडीओ बाहेर आलेला आहे. त्याची सत्यता बाहेर आलीच पाहिजे. या व्हिडीओमध्ये ती महिला कोण आहे, हे कळलंच पाहिजे. का त्या महिलेने आरोप केलेत? आम्हाला जी माहिती मिळालीये, ती खरी-खोटी तपासून बघा. गृहमंत्री इकडे आलेले आहेत. तुम्ही प्रत्येक बाबतीत एसआयटी लावता. माझं तर म्हणणं आहे की, एसआयटीच्या वरची… अगदी रॉ लावायची असेल, तर लावा. कारण आमच्या बाबतीत आता कुठलीच एजन्सी बाकी राहिलेली नाहीये.”
ADVERTISEMENT
वाचा >> जितेंद्र आव्हाड, संजय शिरसाट ठाण्यावरून का भिडले? विधानसभेत काय घडलं?
– “पार्टी विथ डिफरन्स आहे आणि तुमच्यासारखा उपमुख्यमंत्री, ज्याची या राज्यात प्रतिमा आहे. अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही, हे आम्ही हजारदा भाषणात ऐकलं आहे. अशा उपमुख्यमंत्र्यांना आज अशा गोष्टीला सामोरं जावं लागत आहे. आमचं म्हणणं असं आहे की, जी काही माहिती मिळतेय, ज्या तपास यंत्रणा आता काम करत होत्या. त्या तपास यंत्रणांमधल्या महिलांना, ज्यांना भीती वाटत होती. अशा महिलांना फोन करून हे जे प्रकार घडले आहेत. ते या आठ तासांमध्ये आले आहेत. ते आम्ही ऐकतोय. खरं खोटं माहिती नाही.”
ADVERTISEMENT
‘एक्सटॉर्शनचे हजारो किस्से ऐकलेत’
– “अंबादास दानवेंना काही भेटले असतील. आमच्याकडे फोनवरून काही माहिती आली असेल. आता तुमचं काम आहे हे सगळं शोधणं, पण आमचं म्हणणं आहे की ही महिला कोण आहे, ते पहिलं कळलं पाहिजे. हे महाराष्ट्राला कळलंच पाहिजे. ज्या पद्धतीची ही विकृती आहे. ज्या पद्धतीने हे एक्सटॉर्शन केले जातं. पैशाच्या एक्सटॉर्शनचे आम्ही हजारो किस्से ऐकलेत.”
– “सेक्सटॉर्शन चाललं आहे. ते कालच्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. त्यामुळे हा प्रकार अतिशय गंभीर आहे. म्हणून सगळं कामकाज बाजूला ठेवून गृहमंत्र्यांनी इथे जाहीर केलं पाहिजे की, याप्रकरणात एसआयटी लावणार का? आठ तासांचे व्हिडीओ आपल्याकडे गेले आहेत.”
वाचा >> Kirit Somaiya यांचा कथित आक्षेपार्ह Video Viral, ‘सामना’ने ‘कशी’ दिली बातमी?
– “त्यांनी जे पत्र गृहमंत्र्यांना दिलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही की हा व्हिडीओ खोटा आहे. त्यांनी असं म्हटलंय की, मी कुठल्याही महिलेवर अत्याचार केलेला नाहीये. याचा अर्थ तो व्हिडीओ खरा आहे, असं अप्रत्यक्षपणे मान्य केलेलं आहे. तो व्हिडीओ खरा असेल, तर त्या व्हिडीओच्या त्या बाजूला कोण होतं? हा व्हिडीओ कुठला, कुणी घेतला? का घेतला? हे त्या बाईच्या संमतीने झालं का, एक्सटॉर्शन आहे? हे सगळं बाहेर आलं पाहिजे. म्हणून गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करा.”
देवेंद्र फडणवीसांना उपरोधिक सवाल
“सीआयएसएफची सुरक्षा घेऊन छोट्या-छोट्या अधिकाऱ्यांना सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्सची धमकी देऊन कदाचित हे प्रकार तर नाही ना झाले? हे तुम्ही नीट तपासा. हे प्रकार यातून बाहेर येतील. या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून हे प्रकार झालेले नाहीये ना? हे पण शोधा. सखोल चौकशी करा. आधी त्याची सुरक्षा काढून घ्या. त्यामुळेच हे सर्व प्रकार होताहेत, असं बाहेर बोललं जातंय. आता कशाला सीआयएफची सुरक्षा हवी. तुम्ही आहात ना सक्षम गृहमंत्री?”, असा उपरोधिक सवाल अनिल परबांनी केला.
ADVERTISEMENT