Madha Lok Sabha 2024 : धैर्यशील मोहिते पाटलांचा पत्ता कट, भाजपचा उमेदवार ठरला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

There is a dispute between Madha Lok Sabha Constituency Mohite Patil and MP Ranjit Nimbalkar and it is predicted that BJP may be affected by it.
There is a dispute between Madha Lok Sabha Constituency Mohite Patil and MP Ranjit Nimbalkar and it is predicted that BJP may be affected by it.
social share
google news

Madha lok sabha election 2024 : एकाच लोकसभा मतदारसंघातून अनेक इच्छुक, अशी स्थिती अनेक मतदारसंघात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय संघर्ष अटळ दिसत आहे. यापैकीच एक मतदारसंघ आहे माढा. या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील हे इच्छुक आहेत, पण चंद्रशेखर बावनकुळेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं खासदार म्हणून काम चांगलं असल्याचे सांगितले. बावनकुळेंनी अप्रत्यक्षपणे उमेदवार कोण असेल याचे संकेत दिले. पण यामुळे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. (Dhairyasheel Mohite Patil vs Ranjeetsingh Naik Nimbalkar bjp)

ADVERTISEMENT

माढा लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून निवडणूक लाढवण्यास इच्छुक आहेत. तशी इच्छा त्यांनी पक्षश्रेठींकडे व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांनी भावी खासदार म्हणून बॅनरही लावले, मात्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी खासदार निंबाळकरांचं कौतुक करत त्यांना हिरवा कंदील दाखवला.

विजयसिंह मोहिते-पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकरांमध्ये झाली खलबत

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर लगेच विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील शिष्टमंडळासह अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. रामराजे निंबाळकर व संजीवराजे निंबाळकर हे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे पारंपरिक विरोधक आहेत. त्यामुळे या भेटीकडे वेगळ्या दृष्टीकोणातून बघितले जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> राहुल गांधींनी बाबासाहेब आंबेडकरांचा देखील अवमान केला -भाजप

या भेटीने माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. फलटण तालुक्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर हे 2019 साली माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर खासदार झाले.

2019 साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संपूर्ण मदत केल्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर 2019 साली खासदार झाले होते.

ADVERTISEMENT

धैर्यशील मोहिते-पाटलांनी आधीपासूनच सुरू केलीये लोकसभेची तयारी

मोहिते-पाटील कुटुंबांमधील असणारे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिवाळीमध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आपण लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अनेकदा त्यांनी उघडपणे आपणच भाजपाच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहोत, असे स्पष्ट केले आहे.

ADVERTISEMENT

विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी अकलूज येथे जाऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची घेतलेली भेट, ही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा >> शिंदे दक्ष आता लोकसभा निवडणुकीवर लक्ष! कधी, कुठे असणार दौरा?

अकलूज येथील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी भेटीदरम्यान विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते-पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार प्रभाकर घारगे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. या भेटीमुळे आणि मोहिते पाटील यांना डावलल्याने भाजप पुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT