Chahat Pandey : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अभिनेत्रीचं काय झालं?
मध्य प्रदेशच्या दमोहची रहिवाशी असलेली टीव्ही अभिनेत्री चाहत पांडेने याच वर्षी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. यावेळी पक्षाने चाहत पांडेला भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत मलैया यांच्याविरूद्ध निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते.
ADVERTISEMENT
Aap Candidate Chahat Pandey lost Election from Damoh Seat : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याचा निकाल अखेर लागला आहे. या निकालात राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात भाजप सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे, तर तेलंगणात काँग्रेसची सरकार आली आहे. या निवडणूकीत अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीने (Aap Candidate) देखील निवडणूक लढवली होती. मात्र आपची कुठेच चर्चा नाही आहे. त्यात मध्यप्रदेशच्या दमोह विधानसभा मतदारसंघातून (Damoh Assembly Constituency) आपने टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे (Chahat Pandey) निवडणूकीच्या मैदानात उतरवले होते. आता या मतदार संघातून चाहत पांडे जिंकली आहे की पराभूत झाली आहे? हे जाणून घेऊयात. (madhya pradesh election result 2023 aap candidate chahat pandey lost election from damoh assembly constituency)
ADVERTISEMENT
मध्य प्रदेशच्या दमोह मतदार संघातून आम आदमी पार्टीने टीव्ही अभिनेत्री चाहत पांडेला निवडणूकीच्या मैदानात उतरवले होते. या दमोह मतदार संघातून भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत मलैया 78 हजार मतांनी आघाडीवर आहे. जयंत मलैया यांच्या आसपास देखील कुणीही त्यामुळे दमोह मतदार संघातून त्यांचा विजय पक्का मानला जात आहे. तर काँग्रेसचे अजय कुमार टंडन 41 हजार मतांनी दुसऱ्या स्थानी आहेत. या दोनच उमेदवारांमध्ये खरी लढत सूरू आहे. अद्याप या निकालाचे 7 राऊंड बाकी आहेत, त्यामुळे निकालात काही उलटफेर होतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा : ‘आशिक’ने घेतला गर्लफ्रेंडचा जीव, व्हॉट्सअॅप स्टेटसला…; रूम नंबर 201 मध्ये काय घडलं?
तिसऱ्या स्थानी बहुजन समाज पार्टीचे प्रताप रोहित आहेत. त्यांना 2281 मते पडली आहे. त्यानंतर आप उमेदवाराचा नंबर लागतो आहे. आपच्या उमेदवार चाहत पांडे यांना फक्त 1733 मते पडली आहेत. त्यामुळे आपने एका अभिनेत्रीला मैदानात उतरवून देखील त्यांचा पराभव झाला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मध्य प्रदेशच्या दमोहची रहिवाशी असलेली टीव्ही अभिनेत्री चाहत पांडेने याच वर्षी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. यावेळी पक्षाने चाहत पांडेला भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत मलैया यांच्याविरूद्ध निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र या निवडणूकीत तिचा सपशेल पराभव होताना दिसतोय.
हे ही वाचा : Revanth Reddy : तेलंगणात केसी रावांना धोबीपछाड, काँग्रेसचा रोवला झेंडा; कोण आहेत रेड्डी?
कोण आहे चाहत पांडे?
चाहत पांडेने अनेक टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. चाहतने वयाच्या 17 व्या वर्षी पवित्र रिश्ता या मालिकेतून करिअरला सुरूवात केली होती. चाहतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने तेनालीरामन, राधा कृष्णन, सावधान इंडिया, नागिन-2, दुर्गा माती की छाया. अलादीन आणि क्राईम पेट्रोल सहीत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती नथ जेवर या जंजीर या मालिकेत महुआची भूमिका साकारते आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT