Maharashtra Cabinet Expansion : अजित पवार एन्ट्री, शिंदे, फडणवीसांसह BJP च्या मंत्र्यांना बसणार मोठा फटका!

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar faction demanded major portfolio in eknath shinde cabinet
ajit pawar faction demanded major portfolio in eknath shinde cabinet
social share
google news

Politics of Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 नेत्यांचा समावेश करण्यात आला. त्यांना कोणती खाती दिली जाणार, यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू असून, अजित पवार गटाने काही महत्त्वाच्या खात्यांची खाती मागितली आहे. राष्ट्रवादीने जी खाती मागितली आहे, ती दिली गेली, तर शिंदे-फडणवीसांसह भाजप नेत्यांना फटका बसणार आहे. (Maharashtra Cabinet Portfolio Allocation)

ADVERTISEMENT

राज्यातील राजकारण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि खाते व मंत्रिमंडळ विस्तार याभोवती फिरताना दिसत आहे. अजित पवारांसह 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण, त्यांच्याकडे अजून कोणतीही खाती सोपवलेली नाही. राष्ट्रवादीकडून काही महत्त्वाची खाती मागितली गेली आहे आणि त्यातून मार्ग काढण्याची कसरत सध्या भाजपला करावी लागताना दिसत आहे.

भाजपच्या मंत्र्यांनाच करावा लागणार त्याग

अजित पवार गट सत्तेत सामील होण्यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह 20 जणांचं मंत्रिमंडळ होतं. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांकडे एक महत्त्वाचं खातं, तर दुसरं कमी महत्त्वाचं खातं दिलं गेलं. दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांकडे मात्र दोन-दोन खाती महत्त्वाची दिली गेली. त्यामुळे आता या मंत्र्यांना त्याग करावा लागणार आहे.

हे वाचलं का?

कुणाची खाती अजित पवार गटाकडे जाऊ शकतात?

अजित पवार गटाकडून अर्थ व नियोजन खात्यासह इतरही काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या मंत्र्यांकडून ही खाती जाऊ शकतात, त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा आदींची नावं चर्चिली जात आहे.

वाचा >> Crime News : “छगन भुजबळांना मारायची सुपारी मिळालीये, उद्या संपवणार”

गेल्यावेळी झालेल्या खातेवाटपावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे 13 खाती दिली गेली, तर 7 खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. यात फडणवीस यांच्याकडे असलेले वित्त व नियोजन हे महत्त्वाचे खाते अजित पवारांना दिले जाणार असल्याचे म्हटलं जात आहे. दुसरीकडे गृहखातं फडणवीस स्वतःकडे ठेवणार असल्याचे सांगितले जात आहे.

ADVERTISEMENT

कुणाची खाती जाऊ शकतात?

गिरीश महाजन हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्याकडे सध्या वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामविकास ही महत्त्वाची खाती आहेत. त्यापैकी एक खाते त्यांच्याकडून जाणार असं म्हटलं जात आहे. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे असलेल्या महिला व बालविकास खातेही अजित पवार गटाकडून मागितलं गेलं आहे. त्यामुळे ते त्यांना सोडावे लागेल, असं म्हटलं जात आहे.

ADVERTISEMENT

वाचा >> शरद पवारांची साथ सोडलेल्या ‘या’ मातब्बर नेत्यांचं काय झालं?, ‘या’ दिग्गजांनी गमावलीय आमदारकी

सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व नागरी पुरवठा अशी दोन खाती रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. यातील अन्न व पुरवठा खाते जाऊ शकते. महाविकास आघाडीच्या काळात हे खाते छगन भुजबळांकडे होते. भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे तीन खाती असून, एक खाते काढले जाऊ शकते, असं सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT