Maharashtra assembly session : राष्ट्रवादीचे आमदार विधानसभेत कुठे बसले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 जुलै रोजी फूट पडली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही ही फूट दिसून आली. अजित पवार गटाचे आमदार सत्ताधारी, तर शरद पवार समर्थक आमदार विरोधी बाकांवर बसले.
ADVERTISEMENT
Maharashtra assembly session today : 2 जुलै रोजी सध्या उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. पक्षातील बहुसंख्य आमदारांना आपल्या बाजूने घेत थेट पक्षावर दावा ठोकला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष, गटनेता आणि मुख्य प्रतोदही नेमला. पण, विधानसभा अध्यक्षांपर्यंत ही फूट पोहोचलीच नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सत्ताधारी बाकांवर बसणार की विरोधी याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सभागृहात राष्ट्रवादीतील फूट दिसून आली.
ADVERTISEMENT
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाल. पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडे सगळ्याचे लक्ष होते. विधानसभा अध्यक्षांपर्यंत अजूनही राष्ट्रवादीतील फुटीबद्दल काहीही माहिती गेलेली नसल्याने अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडेही सगळ्यांचं लक्ष होतं.
वाचा >> Lok Sabha 2024 : भाजपचं ‘खेला होबे’! शिंदे, पवारांनंतर आणखी तीन नेते ‘एनडीए’त
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस 53 पैकी 24 आमदाराचं विधानसभेत हजर होते. यातील काही आमदार विरोधी बाकांवर बसले, तर अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार सत्ताधारी बाकांवर बसले.
हे वाचलं का?
विरोधी बाकांवर कोणते आमदार बसले?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बहुसंख्य आमदारांनी अजित पवारांच्या गटात प्रवेश केला. तर काही आमदार शरद पवारांसोबत आहेत. हे आमदार आज विरोधी बाकांवर बसलेले होते. त्या आमदारांची नावे पुढील प्रमाणे…
1) जयंत पाटील
2) अनिल देशमुख
3) बाळासाहेब पाटील
4) सुनिल भूसारा
5) राजेश टोपे
6) प्राजक्त तनपुरे
7) सुमन पाटील
8) रोहित पवार
9) मानसिंग नाईक
ADVERTISEMENT
अजित पवार गट
1) अजित पवार
2) छगन भुजबळ
3) दिलीप वळसे-पाटील
4) हसन मुश्रीफ
5) धनंजय मुंडे
6) धर्मराज आत्राम
7) संजय बनसोडे
8) अनिल पाटील
9) आदिती तटकरे
10) बबन शिंदे
11) इंद्रनील नाईक
12) प्रकाश सोळंके
13) किरण लहमाते
14) सुनील शेळके
15) सरोज अहिरे
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाडांनी विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं पत्र
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी गटनेते जयंत पाटील यांच्या आदेशाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बसण्याच्या व्यवस्थेबद्दल हे पत्र होतं.
वाचा >> NCP : अजित पवार गटाचा शरद पवारांच्या मनधरणीचा प्रयत्न पुन्हा अयशस्वी
“महाराष्ट्र विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांच्या आदेशानुसार आपणांस कळवण्यात येत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. या 9 सदस्यांना वगळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उर्वरित सर्व सदस्यांची विधानसभा सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची विरोधी पक्षासाठी असणाऱ्या आसनावर बसण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी आपणांस विनंती आहे”, असं या पत्रात जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT