Maharashtra Political Crisis: शिंदेंनी शिवसेना फोडली अन्.. बंडानंतर आजवर काय-काय घडलं?
Maharashtra political crisis: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. पाहा गेल्या 10 महिन्यात सत्तेसाठी नेमकं काय-काय घडलंय.
ADVERTISEMENT
Maharashtra Political Crisis Chronology: मुंबई: महाराष्ट्रात जून 2022 पासून सुरू झालेल्या सत्तासंघर्षाच्या महानाट्याचा नवा अंक सुरू होणार आहे. कारण सुप्रीम कोर्ट या संपूर्ण प्रकरणावर उद्या अंतिम निकाल देणार आहे. अशावेळी राज्याचं अवघं राजकारणच बदलून जाईल. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) काही आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला. तेव्हापासून आजपर्यंत शिंदे आणि ठाकरे (Shinde vs Thackeray) यांच्यात न्यायलयीन पातळीवर मोठा संघर्ष सुरु आहे. ज्याचा एक अंक उद्या संपणार आहे. पण सुप्रीम कोर्टाचा निकाल हा सत्तेच्या महानाट्यावर पडदा पडणार की, नव्या अंकाला सुरुवात होणार हे आता अवघ्या काही तासातच कळणार आहे. याच सगळ्या सत्तासंघर्षाची नेमकी टाइमलाइन आपण टाकूयात एक नजर. (maharashtra political crisis after eknath shindes rebellion what has happened in the power struggle in maharashtra so far)
ADVERTISEMENT
सत्तासंघर्ष: 20 जून 2022 ते 10 मे 2023 नेमकं काय-काय घडलं
- 20 जून 2022:
शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह महाराष्ट्र सोडत थेट भाजपशासित गुजरात राज्यातील सुरत गाठलं
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. पण त्यावेळी शिवसेनेचे आणखी 10 ते 12 आमदार या बैठकीला गैरहजर होते.
हे वाचलं का?
- 21 जून 2022
बंडाच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी युती तोडण्यास सांगितलं. तसेच भाजप युतीचे सरकार स्थापन करण्याची मागणी केली होती.
- 22 जून 2022
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 40 आमदारांसह आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार असल्याचे सांगितले.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेनेसोबतच राहण्याचे आश्वासन दिले.
ADVERTISEMENT
- 23 जून 2022
शिवसेनेच्या 37 बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. यांनी आपलीच शिवसेना खरी आणि आम्हीच शिवसैनिक असल्याचे सांगितलं.
- 24 जून 2022
शिवसेनेने एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणी उपाध्यक्षांकडे केली. दरम्यान, उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठरावही आणण्यात आला. जो फेटाळण्यात आला.
हे ही वाचा >> ’16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय फिरवू शकत नाही’, संजय राऊतांचं विधान
- 25 जून 2022
उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा पाठविल्या. ज्यानंतर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
- 26 जून 2022
सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना, केंद्र, महाराष्ट्र पोलीस आणि उपाध्यक्षांना नोटीस पाठवली होती. बंडखोर आमदारांना न्यायालयांकडून दिलासा मिळाला.
एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्षांनी जी अपात्रतेबद्दलची नोटीस बजावली होती त्याला आव्हान दिलं होतं. नोटीशीला उत्तर द्यायला पुरेसा वेळ मिळाला नाही दोनच दिवसाची मुदत देण्यात आली आहे आणि ही गोष्ट नैसर्गिक न्यायाला धरून नाही असं शिंदे गटाचे म्हणणं होतं
- 28 जून 2022
भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांकडे विधानसभा बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली.
- 29 जून 2022
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती.
- 30 जून 2022
भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे ठरले.
राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस म्हणजेच युतीचे सरकार स्थापन झालं.
- 3 ऑगस्ट 2022
शिंदे-फडणवीस यांन सरकार स्थापन केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली. आम्ही 10 दिवस सुनावणी पुढे ढकलली, पण तुम्ही सरकार बनवंल असं शिंदे-फडणवीसांना सुनावलं होतं.
- 4 ऑगस्ट 2022
जोपर्यंत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश दिला होता. तसेच या प्रकरणाची सुनावणी 8 ऑगस्टला ठेवली. पण 8 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली नाही.
हे ही वाचा >> Maharashtra Political Crisis: ..तर यांची आमदारकी जाणार, CM शिंदेसह ‘ते’ 16 आमदार कोण?
- 23 ऑगस्ट 2022
सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले.
- 14 फेब्रुवारी 2023
घटनापीठाने या दिवसापासून सलग सुनावणी घेत हे प्रकरण सात जणांच्या घटनापीठाकडे द्यायचा की नाही यावर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले.
- 17 फेब्रुवारी 2023
तीन दिवसांच्या सुनावणीनंतर सात जणांच्या घटनापीठाकडे या प्रकरणाची सुनावणी देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आणि याच प्रकरणी 5 जणांच्या घटनापीठासमोर 21 फेब्रुवारीपासून सलग सुनावणी घेईल असं स्पष्ट केलं.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला.
- 16 मार्च 2023
साधारण नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टात ही सुनावणी संपली. ज्याचा निकाल हा राखून ठेवण्यात आला..
- 10 मे 2023
सुप्रीम कोर्टाने निकाल 11 मे रोजी जाहीर करण्याची केली घोषणा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT