Maharashtra politics : युतीतील संघर्षाची धग कायम! भाजपचा शिवसेनेवर पलटवार
एका जाहिरातीने भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्षात भर घातल्याचे समोर आले आहे. ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रामध्ये शिंदे’, या जाहिरातीने भाजप दुखावल्या गेल्याचे लपून राहिले नाही.
ADVERTISEMENT
Maharashtra politics latest news : एका जाहिरातीने भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्षात भर घातल्याचे समोर आले आहे. ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रामध्ये शिंदे’, या जाहिरातीने भाजप दुखावल्या गेल्याचे लपून राहिले नाही. चंद्रशेखर बावनकुळेंपासून भाजपच्या अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला खडेबोल सुनावले. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून समन्वयाची भूमिका घेण्याचे संकेत दिले गेलेले असतानाच भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं आहे. उल्हासनगरमध्ये लागलेल्या होर्डिंग्जमुळे भाजप-शिवसेना युतीतील संघर्षांची धग कायम असल्याचेच पुन्हा एकदा समोर आले आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना-भाजप युती होऊन वर्ष होत नाही, तोच युतीत संघर्षाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची ठाण्यातच कोंडी केली. त्यामुळे एकनाथ शिंदे पुढे काय भूमिका घेणार, याबद्दल वेगवेगळे कयास लावले जात असतानाच एका जाहिरातीमुळे भाजप-शिवसेनेतील संघर्ष आणखी वाढला.
हेही वाचा >> ‘बेडूक कितीही फुगला तरी..’, BJP च्या जिव्हारी लागली जाहिरात; खासदाराने शिंदेंना सुनावलं!
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह वापरून देण्यात आलेल्या जाहिरातीत ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, असा गाजावाजा जाहिरात देऊन करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना अधिक पसंती असल्याचा मुद्दा या जाहिरातीतून अधोरेखित करण्यात आला. त्यानंतर आता भाजपकडून होर्डिंग लावून उत्तर देण्यात आलंय.
50 कुठं आणि 105 कुठं? भाजपचं होर्डिंगमधून उत्तर
उल्हासनगरमध्ये देवेंद्र फडणवीस किंग मेकर, असे होर्डिंग्ज झळकले आहेत. हे होर्डिंग्ज भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप रामचंदानी आणि कपिल अडसूळ यांनी लावले आहेत.
उल्हासनगरमध्ये लावण्यात आलेल्या या होर्डिंग्जवर म्हटलं आहे की, “50 कुठं आणि 105 कुठं ?”, असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेला सवाल केला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ठरलं तर! आशिष देशमुख ‘या’ दिवशी करणार भाजपमध्ये घरवापसी
मुख्यमंत्रीपद देण्याच्या अनुषंगाने म्हटले आहे की,”हा आमच्या भाजपचा मोठेपणा! देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है…” पुढे देवेंद्र फडणवीसांच्या फोटोजवळ किंग मेकर असा उल्लेख करण्यात आलेला आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेच्या जाहिरातीत काय होतं?
– “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्टात शिंदे, अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे.”
– “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.”
– “सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल. म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.”
– “मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली आहे.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT