गौप्यस्फोट! एकनाथ शिंदे गुवाहाटीत असतानाच पवार-पटेलांचा झाला होता प्लॅन
एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये बंड केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 51 आमदारांनी शरद पवारांना पत्र दिले होते. भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची पत्रात केली होती मागणी.
ADVERTISEMENT
Politics Of Maharashtra : 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले. शिवसेनेच्या आमदारांना घेऊन ते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. त्याचवेळी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी भाजपसोबत जाण्याचा प्लॅन केला होता. तसं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले होते. पण, शरद पवारांनी लवकर निर्णय घेतला नाही आणि तोपर्यंत एकनाथ शिंदे यांनी परत येऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, अशी खळबळजनक माहिती खुद्द प्रफुल पटेल यांनीच दिली आहे.
ADVERTISEMENT
‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार समर्थक प्रुफल पटेल यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार होतं. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 पैकी 51 आमदारांनी शरद पवार यांनी पत्र दिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करावं, अशी मागणी त्या पत्रात केलेली होती, असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं.
शरद पवारांनी विलंब केला आणि शिंदेंनी संधीचा फायदा घेतला
प्रफुल पटेल असंही म्हणाले आहेत की, “आमदारांनी दिलेल्या पत्रावर शरद पवार यांनी लवकर निर्णय घेतला नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी संधीचा फायदा घेतला आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले.” राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जावे याबद्दलची प्रक्रिया 2022 च्या मध्यापासूनच सुरू झाली होती, असंही पटेलांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
वाचा >> अजित पवारांची युती सरकारमध्ये एन्ट्री! शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता
आमदार-खासदारांसह सगळ्यांचीच होती इच्छा
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत गेले पाहिजे आणि सरकार स्थापन केलं पाहिजे, असा सूर केवळ आमदार, खासदारांचाच नव्हे तर पक्षाच्या गाव खेड्यातील कार्यकर्त्यांचाही होता, असं पटेल म्हणाले. “अनेक आमदारांना त्यांच्या मतदारसंघासाठी निधी मिळत नव्हता. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नव्हती. इतरही समस्यांना सामोर जावं लागत होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत गेल्याने हे सगळे प्रश्न प्राधान्यक्रमाने सुटतील”, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेसोबत आघाडी आता भाजपसोबत
प्रफुल पटेल यांची अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. अजित पवारांचं समर्थक केल्यानंतर शरद पवार यांनी त्यांची या पदावरून हकालपट्टी केली आहे. दरम्यान, पटेल पुढे असं म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत राहिली आहे. त्यामुळे भाजपसोबत सरकारमध्ये जाणे काही वावगे नाही, अशी भावना आमदारांनी व्यक्त केली. शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो.”
ADVERTISEMENT
वाचा >> NCP: अजितदादा आणि शरद पवारांसोबत किती आमदार?, ‘ही’ आकेडवारी बरंच काही सांगते!
राष्ट्रीय हित लक्षात घेऊन आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. ही गोष्ट नवी नाहीये. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत, अशी भूमिका प्रफुल पटेलांनी मांडली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT