लोकप्रियतेचा मुद्दा वगळला, देवेंद्र फडणवीस झळकले! शिवसेनेकडून ‘डॅमेज कंट्रोल’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis with Eknath Shinde in Shiv Senas advertisement
Devendra Fadnavis with Eknath Shinde in Shiv Senas advertisement
social share
google news

Maharashtra Politics News Today : ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रामध्ये शिंदे’ या जाहिरातीने भाजप-शिवसेना युतीत ठिणगी पडली. भाजपमधून नाराजीचा सूर उमटला आणि पडद्यामागेही बऱ्याच घटना घडल्या. या सगळ्या नाट्यानंतर ती जाहिरात शिवसेनेने दिली नाही, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला. पण, या जाहिरातीमुळे भाजपमधून उमटलेल्या नाराजीच्या सूराचं ‘डॅमेज कंट्रोल’ जाहिरातूनच करण्यात आलं. शिवसेनेकडून देण्यात आलेल्या या जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांचा फोटोही झळकला आणि लोकप्रियतेचा मुद्दाही गायब झालेला दिसला आहे. (maharashtra politics news marathi)

ADVERTISEMENT

‘त्या’ जाहिरातीमध्ये काय होतं?

“राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्टात शिंदे, अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.”

“सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल. म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.”

हेही वाचा >> Shiv Sena UBT : “जो बाळासाहेबांचा झाला नाही तो मोदींचा तरी होईल का?”

“मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली आहे”, असा मजकूर मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत होता.

Maharashtra Political updates : Shiv Sena publish advt in newspaper
शिवसेनेची जाहिरात. या जाहिरातीत एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या नव्या जाहिरातीत काय?

बुधवारी (14 जून) प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत भाजपची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे दिसत आहे. या जाहिरातीचा मथळा “जनतेच्या चरणी माथा… गर्जा महाराष्ट्र माझा!”, असा आहे.

ADVERTISEMENT

जाहिरातीत म्हटलं आहे की, “जनतेचा कौल शिवसेना-भाजप युतीलाच! 49.3 टक्के जनतेचा शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाला आशीर्वाद. प्रमुख विरोधक 26.8 टक्के, तर अन्य 23.9 टक्के.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘BJP ला आज कळलं असेल ‘या’ माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा’, जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?

– “देशाला विकासाची दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला 84 टक्के नागरिकांची पसंती.”
– “डबल इंजिन सरकारमुळेच राज्याच्या विकासाला गती येत असल्याचे 62 टक्के नागरिकांचे मत.”
– “46.4 टक्के नागरिकांची भाजप-शिवसेनेला पसंती. प्रमुख विरोधक 34.6 टक्के, अन्य 19 टक्के.”

‘भाजप-शिवसेना युती’वर जोर

जाहिरातीत असंही म्हटलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साथीने महाराष्ट्रात ‘समृद्धी’ धोरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनामुळे गेल्या वर्षभरापासून विकास आणि प्रगतीच्या वाटेवर राज्याची गाडी वेगाने धावतेय. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना-भाजपच्या भक्कम युतीमुळे पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, उद्योग क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे.”

“शेतकऱ्यांना सन्मान देणारे, आधार देणारे सरकार म्हणून ओळख निर्माण झाली आहे. महिलांना प्रवासात सवलत आणि रोजगार संधी देण्यासाठी युतीने निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच सरकारच्या कामगिरीवर सामान्य नागरिक समाधानी आहेत. जनतेच्या स्वप्नातील राज्य आकाराला येतेय. त्यामुळे नागरिकांचा कौल युतीलाच.”

शिंदेंबरोबर फडणवीस, लोकप्रियतेचा मुद्दा गायब

‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रामध्ये शिंदे’ या जाहिरातीत फक्त एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो होता. महत्त्वाचं म्हणजे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पसंती एकनाथ शिंदे यांना असल्याचा मुद्दा प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आला होता. मात्र, आजच्या जाहिरातीत हा मुद्दा वगळण्यात आला असून, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो जाहिरात आहेत.

हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ सर्व्हेमध्ये नेमकं काय?

जाहिरातीच्या शेवटी शिवसेनेतील 9 मंत्र्यांचे फोटोही छापण्यात आले आहेत. शिवसेनेच्या जाहिरातीत भाजप नेत्यांच्या फोटोबरोबरच भाजपचे निवडणूक चिन्ह कमळही ठळकपणे दाखवण्यात आले आहे. मंगळवारी (13 जून) प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमुळे निर्माण झालेल्या वादावर पांघरून घालण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT