‘2019 मध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री करणं ही सर्वात मोठी चूक होती’
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शिबिरामध्ये बोलताना अजित पवारांवर गंभीर आरोप करत त्यांनी अजित पवारांना बंडखोरीनंतरही उपमुख्यमंत्री करणं ही मोठी चूक असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
सकाळी फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाने टाळ्या वाजवणारे लोक संध्याकाळी गोळवळकर आणि हेगडेवार यांचे नाव कसं काय घेऊ शकतात? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे शिर्डी येथे शिबिर आयोजित केले गेले आहे. या शिबिरामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या बंडखोरीवर जोरदार प्रहार केला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी बंड करूनही त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री करणं ही राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी चूक होती असाही जोरदार हल्लाबोल त्यांनी केला.
ADVERTISEMENT
अजितदादांवर गंभीर आरोप
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आजच्या शिर्डीतील शिबिरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करणाऱ्या अजित पवार यांच्यावर तर टीका केलीच मात्र त्याचवेळी त्यांनी अजित पवारांना मदत करणाऱ्यांवरही गंभीर आरोप करत टीका केली. अजित पवारांनी सामान्य कार्यकर्त्यांना दूर करण्याचे काम केले असल्याचा गंभीर आरोपही त्यांन केला आहे.
टाळ्या वाजवणारे लोक
जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका करताना म्हणाले की, सकाळी फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाने टाळ्या वाजवणारे लोक संध्याकाळी गोळवळकर आणि हेगडेवार यांचे नाव कसं काय घेऊ शकतात. तेवढं करून ते थांबत नाहीत तर त्यानंतरही ते पुन्हा सांगतात की, छे छे आम्ही तर फुले, शाहू आंबेडकरांचीच माणसं यावर बोलत त्यांनी अजित पवार गटावर टीका केली.
हे वाचलं का?
राष्ट्रवादीची मोठी चूक
अजित पवार एकीकडे फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतात आणि त्यांच्याबरोबर जाऊन का बसतात असा सवाल करून तुम्ही ही पॉलिसी असल्याचेही सांगता ते कोणत्या धर्तीवर सांगता असा सवालही त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारांनी बंडखोरी केली आणि भाजपबरोबर जाऊन बसले मात्र त्यानंतरही त्यांना राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यावरूनच जितेंद्र आव्हाड यांनी जाहिरपणे बोलत शरद पवारांची माफी मगात त्यांनी सांगितले की, 2019 नंतर बंड केल्यानंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदी बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती असंही त्यांनी स्पष्ट सांगितले. एकदा माणूस गद्दार असेल तर त्याच्या मनात ते असणारच असं सांगत त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोपही केले.
कार्यकर्त्यांना दूर केले
अजित पवारांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, अजित पवारांवर टीका करताना आता मला काहीच वाटत नाही. कारण मला त्यांच्याकडून काही मिळालं नाही, आणि मला पुन्हा त्यांच्याकडे जायचेही नाही म्हणत त्यांनी यावेळी दत्ता मेघे या कार्यकर्त्याला शरद पवारांपासून अजित पवारांनी कसे तोडले त्याचीही त्यांनी एक वाईट आठवण सांगितली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT