Manisha Kayande: ‘आमदारकीसाठी मी उद्धव ठाकरेंच्या मागे लागली नव्हती, त्यांनीच…’, सगळंच सांगितलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manisha Kayande has made serious allegations against Uddhav Thackeray after joining Shiv Sena.
Manisha Kayande has made serious allegations against Uddhav Thackeray after joining Shiv Sena.
social share
google news

Political News in Maharashtra: मुंबई: शिवसेनेत (Shiv Sena) पक्षप्रवेश केल्यानंतर विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी आज (19 जून) पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) थेट आरोप केले आहेत. अनेकदा सांगूनही ठाकरेंनी भूमिका बदलली नाही. हिंदुत्वाच्या भूमिकेचा त्याग केला. बऱ्याचदा हे सहन केलं. पण डोक्यावरुन पाणी गेल्याने अधिकृत शिवसेनेत प्रवेश केला. मला उद्धव ठाकरेंनी आमदारकी दिली. पण मी काही त्यासाठी त्यांच्या मागे लागली नव्हती. असं म्हणत मनिषा कायंदे यांनी ठाकरेंवर टीका केली. (manisha kayande mlc maharashtra shiv sena uddhav thackeray cm eknath shinde hindutva political news in maharashtra)

ADVERTISEMENT

पाहा पत्रकार परिषदेत मनिषा कायंदे नेमकं काय-काय म्हणाल्या…

‘तुमच्या मनात प्रश्न असेल की, मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत 10 वर्ष काम करत होते. विधानपरिषदेचं सदस्यत्वही त्यांनी मला दिलं. मान सन्मान दिला. परंतु असं काय घडलं की, मी आता एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. पहिले प्रथम 2012 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला तो.. म्हणजे बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत केला होता. आता देखील मी शिवसेनेतच आहे. नेतृत्वात बदल झाला आहे का? तर हो खरं आहे. अधिकृत शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.’

‘त्यामुळे मी शिवसेनेतच आहे.. पक्ष बदल तर केलेला नाही. दुसरं एकंदरच आपल्याला माहिती आहे की, माझा राजकीय प्रवास मोठा आहे.. मी भाजपमध्ये गेली अनेक वर्ष काम केलं. पण मी सुरुवातीपासूनच शिवसेनची मतदार होती. त्यामुळे शिवसेनेची जी विचारधारा आहे आणि भाजपची.. ही समसमान होती.’

हे वाचलं का?

‘गेली 3 वर्ष महाविकास आघाडी झाली.. 2019 ला शिवसेना भाजप एकत्र लढले आणि नंतर युती तुटली. याला अनेक कारणं आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोनाचं संकट आलं. उद्धव ठाकरे यांची आम्ही भक्कम साथ दिली. पण महाविकास आघाडीसमोर ज्या समस्या येत गेल्या अगदी विभिन्न विचारधारा.. त्या न पटण्यासारख्या होत्या.’

हे ही वाचा >> टीना दाबीची बहीण IAS Riya Dabi ने गुपचूप केलं लग्न, नवरदेव कोण?

‘पक्षादेश म्हणून आम्ही सतत काम करत होतो. जरी काही गोष्टी आवडत नव्हत्या. अतिशय जुने-जाणते जे शिवसैनिक होते त्यांना ही महाविकास आघाडी कधीच आवडली नव्हती. परंतु पक्षाची जी भूमिका ती आपली भूमिका.. पण जेव्हा पाणी डोक्यावरुन जातं. मग तो सावरकरांचा मुद्दा असो..’

ADVERTISEMENT

‘दुसरं म्हणजे मी जो निर्णय घेतला शिंदेसाहेबांसोबत काम करण्याचा… मी एक कार्यकर्ती आहे. मला विधानपरिषदेचं सदस्यत्व दिलं. मी काही त्याच्या मागे लागली नव्हती. अर्थात इच्छा नव्हती असं नाही. पण मी काही त्यासाठी आटापिटा केला नाही. परंतु तो मान-सन्मान देखील दिला शिवसेनेने.’

ADVERTISEMENT

‘काही गोष्टी पटत होत्या, नव्हत्या… पण पक्षप्रमुखाची साथ सोडायची नाही.. हा विषय नेहमी मनात, हृदयात होता. परंतु पुढे जाऊन विचारधारा भरकटतेय. माझी जी मुख्य हिंदुत्वाची विचारधारा होती त्यापेक्षा दूर जाणारी होती. ते कुठेतरी मनाला पटत नव्हतं. कुठलंही निधीचं वैगरे आमिष मला दाखवण्यात नव्हतं.’

हे ही वाचा >> ‘मविआ’वरच प्रश्नचिन्ह! ठाकरेंसमोरच संजय राऊतांचा काँग्रेस, राष्ट्रवादीला इशारा!

‘आता काही लोकांना वाटतं की, माझी टर्म पुढच्याच वर्षी संपणार आहे. पण असं काही नाहीए. माझी टर्म संपायला 1 वर्ष बाकी आहे. त्यामुळे मी शिंदेंना सांगितलं की, मला संघटनेत एक पद चांगलं द्या. जिथे मला मनमोकळेपणे काम करता येईल.’

‘उद्धव ठाकरेंनी मला संभाजीनगरचं संपर्क प्रमुख केलं. विदर्भातील दोन जिल्हे दिले. त्यानंतर माझ्यासारख्या सीनियर व्यक्तीला जबाबदारी दिल्यानंतर एखादी ज्युनिअर व्यक्ती येते आणि आपल्यालाच सांगायला लागते.. जेव्हा हे आपण बोलायला प्रयत्न करतो.. याबद्दल मी बोलले देखील. पण माझं ते बोलणं गांभीर्याने घेतलं नाही.’

‘पक्ष कार्यकर्त्यांना मनमोकळेपणे बोलता आलं पाहिजे. जी कुचुंबणा होते. सर्व नेत्यांशी मी बोलले जी माझी अडचण होती. मी जबाबदारी मागत होती. वैयक्तिक मला कोणाच्या कार्यपद्धती बद्दल बोलायचं नव्हतं.’ असं म्हणत कायंदे यांनी आपण शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश का केला याबाबत बाजू मांडली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT