Maratha Reservation: जरांगे पाटलांचं ठरलं म्हणाले, ‘…तर आम्ही फडणवीसांच्या घरात जाऊन बसू’
मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभराचा दौरा करून आता पुन्हा एकदा मुंबईत धडकणार असल्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामध्ये आमची वाहनं अडवली तर आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरात जाऊन बसू असा इशाराच त्यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आंदोलन चालू आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सरकारबरोबर चर्चा करून त्यांनी राज्यातील काही जोरदार दौराही केला. त्यांच्या दौऱ्यालाही राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना मनोज जरांगे पाटील यांनी आता आंदोलनाचा पुढचा ठप्पा म्हणून मुंबईत येऊन धडकणार असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी मुंबईकडे रवाना होताना गाड्या अडवल्या तर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या नागपूर आणि मुंबईतील (Nagpur-Mumbai) घरात जाऊन बसू असा इशाराच दिला आहे. त्यामुळे आता हे वातावरण आणखी तापले आहे.
ADVERTISEMENT
आरक्षण ओबीसी कोट्यातून
मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि ते ओबीसी कोट्यातून देण्यात यावे अशी मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून अंतरवाली सराटीत आंदोलन छेडण्यात आले. त्यासाठी सरकारबरोबर चर्चाही करण्यात आली मात्र ती चर्चा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे फिसकटत गेली. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी आता हे आंदोलन आता मुंबईत करणार असून ते लोकशाही पद्धतीनेच होईल असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा >> Shiv Sena UBT: ‘त्या एका जिद्दीने मी उभा आहे…’, उद्धव ठाकरेंनी थेट मोदींनाच दिलं चॅलेंज!
सगळी मैदानं लागणार
यावेळी त्यांनी सांगितले की, मुंबईसाठी 20 जानेवारी रोजी आम्ही अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना होणार आहोत. या दरम्यान आमच्या गाड्या अडवण्यात आल्या तर देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर, मुंबईतील घरात जाऊन बसू असा इशाराच त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी हेही सांगितले आहे की, मुंबईतील सगळी मैदानं आम्हाला लागणार आहे. त्यासाठी सरकारने तयारी करावी असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ओबीसींचं होणार आंदोलन
मुंबईत एकीकडे मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील हटून बसले आहेत, तर दुसरीकडे 20 तारखेला मुंबईमध्ये ओबीसी आंदोलनही होणार आहे. मात्र त्याबाबत मला त्यांचे काही माहित नाही. मात्र आमच्या आंदोलनाला परवानगी मिळाली नाही तरी आम्ही हे आंदोलन लोकशाही मार्गाने करणार असल्याचा इशारा दिला आहे.
ट्रॅक्टर-ट्रॉली आणणारच
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मुंबईमधून येऊन आंदोलन करणार असल्याचे सांगितले असले तरी त्यांनी त्यांच्या आंदोलनामध्ये ट्रॅक्टर आणि ट्रॉलीही येणार असल्याचे सांगितले आहे. हे आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं तर त्याचा त्रास मुंबईला होणार आहे. कारण वाहनांचा मोठा प्रश्न निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. तर जरांगे पाटील यांनी हे आंदोलन आम्ही करणार असल्याने आमच्या साहित्यासाठी हे आमची वाहनं लागणारच आहेत. त्यासाठीच आम्ही ट्रॅक्टर आणि ट्रॉली आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.याच काळात ओबीसी समाजाचंही आंदोलन आहे, त्यामुले प्रशासनासाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Lok Sabha 2024 : मुंबईतील तीन जागांवर डोळा, काँग्रेसच्या मनात काय?
ADVERTISEMENT