Manoj Jarange: ‘या सरकारला एकाचा बळी घ्यायचाय तर…’, जरांगे-पाटलांना अश्रू अनावर!

मुंबई तक

ADVERTISEMENT

maratha reservation antarwali sarathi manoj jarange patil said if this government wants to kill one let it kill he is break down in tears
maratha reservation antarwali sarathi manoj jarange patil said if this government wants to kill one let it kill he is break down in tears
social share
google news

Maratha Reservation Manoj Jarange: अंतरवाली-सराटी (जालना): मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मागील 7 दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांनी पाणी प्यावं अशी आग्रही मागणी उपोषण स्थळी हजर असलेल्या शेकडो लोकांनी मागणी केली. मात्र, यावेळी जरांगेंनी त्यांच्याशी संवाद साधताना थेट असं म्हटलं की, ‘या सरकारला एकाचा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या…’ ज्यानंतर येथील वातावरण फारच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. (maratha reservation antarwali sarathi manoj jarange patil said if this government wants to kill one let it kill he is break down in tears)

ADVERTISEMENT

जरांगे पाटलांना अश्रू अनावर..

दरम्यान, आज (30 ऑक्टोबर) मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती काहीशी खालावली. ज्यामुळे त्यांनी पाणी तरी घ्यावं अशी मागणी तेथील मराठा आंदोलकांनी जरांगे-पाटलांना केलं. त्यावेळी जरांगेंनी तेथील उपस्थितांशी भावूक शब्दात संवाद साधला.

हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘मी विष पिऊन मरते, पण जरांगेंचा…’, मराठा आंदोलक महिला हंबरडा फोडत काय म्हणाली?

यावेळी ते म्हणाले की, ‘तुम्ही जर मला पाणी प्यायचा हट्ट केला तर आरक्षण कसं मिळेल? प्रत्येकाने असाच हट्ट केला आपल्या लेकरांना कसं आरक्षण मिळेल. तुमची माया मला कळते, पण जर आपण असं पाणी प्यायलो तर आपल्याला न्याय कसा मिळेल. मी या समाजाला माय-बाप मानतो हे खरं आहे. मी समाजाच्या सुद्धा पुढे जात नाही. पण तुम्ही जर असा हट्ट धरत राहिले तर आपली जात खूप अन्याय सहन करतेय. तिला न्याय कसा मिळेल?’

‘सरकारला एकाचा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या. पण तुम्ही जर असा हट्ट धरला, तर आपल्याच लेकराला न्याय मिळणार नाही. मला वाटतं जाणूनबुजून मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय केला जातोय. मग आपल्याला आपल्या लेकराला न्याय द्यायची एवढी संधी आहे. आपल्या कोट्यवधी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आणि आरक्षण देण्यासाठी एक जणांच्या जीवाचं काही झालं तरी चालेल पण आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे.’

‘आपल्या समाजाला न्याय मिळायचा दिवस जवळ आलाय. पण तुम्ही जर असं रडायला लागले, पाणी प्या म्हणून हात जोडत राहिले तर आपल्या लेकरांना न्याय कसा मिळेल?’

‘मला वाटतं मी.. माझ्या समाजाचा शब्द मी कधीपर्यंत डावलत नाही आणि कधी डावलणार देखील नाही. मला या समाजाच्या पेक्षा कोणी मोठं नाही.’ असं मनोज जरांगे-पाटील यावेळी म्हणाले.

हे ही वाचा >> Maratha Reservation : बीडमध्ये अजित पवार गटाच्या आमदाराचा बंगला आंदोलकांनी पेटवला

दरम्यान, उपोषणस्थळी उपस्थितांनी प्रचंड आग्रह केल्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिण्याचं मान्य केलं. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांच्या आग्रही पवित्र्यानंतर राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचा लक्ष लागून राहिलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT