Maratha Reservation : ”ही तर भुजबळांची फजिती”, जरांगे पाटलांनी डिवचलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

maratha reservation manoj jarange patil chhagan bhujbal kunabi certificate cm eknath shinde
maratha reservation manoj jarange patil chhagan bhujbal kunabi certificate cm eknath shinde
social share
google news

Manoj Jarange Patil, Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. अशात आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भूजबळांना डिवचलं आहे.धनगर, माळी, लिंगायत आणि मुस्लिम समाजाची कुणबी नोंदी आढळल्या आहेत.त्यामुळे भूजबळ साहेबांची फजिती दिसतेय असे विधान करून जरांगे पाटलांनी भूजबळांना डिवचलं आहे. (maratha reservation manoj jarange patil chhagan bhujbal kunabi certificate cm eknath shinde)

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटली माध्यमांशी बोलत होते. यावेळी माध्यमांनीधनगर कुणबी, माळी कुणबी, लिंगायत कुणबी आणि मुस्लिम कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांना देखील ओबीसींचा लाभ द्यावा का? असा सवाल मनोज जरांगे पाटलांना केला होता. यावर आता ही भूजबळ साहेबांची फजिती दिसतेय मग, यावर आता त्यांनीच उत्तर द्याव, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. मराठ्यांवर तर खूप आगपाखड करत होते, विषचं पेरत होते, आता भूजबळ साहेब इतक्यांच्या विरोधात जाणार का? असा सवाल जरांगे पाटलांनी करत यावर भूजबळ साहेबांनी उत्तर द्यावे, असे म्हटले.

हे ही वाचा : भावोजीसाठी बोट कापायला तयार झाला, मांत्रिकाने गळाच…; 22 वर्षीय तरूणासोबत काय घडलं?

तसेच तुम्ही भूजबळांना विरोध करता? असा सवाल माध्यमांनी केला. यावर जरांगे पाटील म्हणाले, ते एकटेच विरोध करतात. त्यांनी बंद करावा मग आम्हीही बंद करतो. आमच्या नोंदी असताना आम्हाला देत नाहीत. आता मी तर म्हणतो त्यांना देखील ओबीसींमध्ये घ्या,अशी विनंती जरांगे पाटलांनी केली. तसेच आमचं असून आम्हाला मिळेना मग तुमचं कशाला आम्ही नाही म्हणू.या तुम्ही सगळे जण, आपण सगळेच जाऊन ओबीसी आरक्षण घेऊ असे आवाहन देखील जरांगे पाटलांनी यावेळी केले.

हे वाचलं का?

तसेच आम्हाला गाजर दाखवू नका, मुख्यमंत्र्यांनी टाईम बॉंड लवकर द्यावा. आम्हाला 24 डिसेंबरच्या आता आरक्षण हवंय, असे देखील जरांगे पाटलांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : EC सुनावणी: ‘अजित पवार गटाचा खोटेपणा, 20 हजार शपथपत्रात..’, पवार गटाच्या वकिलांचा मोठा आरोप

तुम्ही गिळलेलं बाहेर काढणार

जरांगे पाटलांना देवेद्र फडवणीसांच्या त्या विधानावर प्रश्न विचारण्यात आला, देवेंद्र फडणवीसांच्या मते मराठा समाजाला ईडब्ल्युएसमध्ये साडे 8 टक्के आरक्षण मिळू शकते,ओबीसीमध्ये साडेतीन टक्के मिळेल. त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं तर ते 7 ते साडे 8 टक्के मिळेल. आणि ओबीसीत तुम्हाला फारसा लाभ मिळणार नाही, त्यामुळे त्यांनी विचार करायला हवा, असे आवाहन फडणवीसांना केले होते. यावर जरांगे पाटील म्हणाले, ओबीसीमध्ये लाभ कमी होणार नाही, असे काहीच नाही असे म्हणत त्यांनी फडणवीसांचा प्रस्ताव धुडकारला. तुम्ही पुर्वीपासूनच जे आमचं गिळलंय. ते गिळलेले तुम्हाला द्यायचं नाही आहे, अशी टीका जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केली. तुम्ही गिळलेले आता बाहेर काढायचा प्रयत्न मराठा समाजाने केला आहे. कारण आमच्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय.त्यामुळे आम्ही ताकदीने लढवून ते मिळवायचा प्रयत्न करू असे देखील जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT