Maratha Reservation : शंभूराज देसाई छगन भुजबळांवर संतापले, ”मोठेपणा घेण्यासाठी…”

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Shambhuraj Desai criticized Chhagan Bhujbal, Maratha Reservation : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र फटाफट सर्व मार्गाने द्यायचं, हे काय बरोबर नाही, हे सगळं चुकीचं होत आहे, असे म्हणत अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते छगन भूजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता. भुजबळांच्या याच भूमिकेवर शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देत त्यांना सुनावलं आहे. भुजबळांनी विनाकारण संभ्रम निर्माण केलाय. त्यांचे विधान 100 टक्के चुकीच असल्याचे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी म्हटले आहे. (maratha reservation manoj jarange patil shambhuraj desai criticized chhagan bhujbal on kunabi certificate)

ADVERTISEMENT

शंभूराज देसाई पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भूजबळांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. ओबीसींच काढून मराठ्यांना द्यायचं हे आमच्या मनातही नाही आहे. पण जे होणारचं नाही आहे ते भासवायचं आणि ते मी थांबल्याचा मोठेपणा घ्यायचा, अशी टीका शंभूराज देसाई यांनी भुजबळांवर केली. तसेच भुजबळांचे विधान 100 टक्के एकदम चुकीचे असल्याचेही शंभूराज देसाई यांनी म्हटले. तसेच भुजबळांनी अशाप्रकारचं वक्तव्य करून महाराष्ट्रातल्या जाती-जातीतल्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये,असे आवाहन देखील शंभूराज देसाई यांनी केले.

हे ही वाचा :Crime: घरात शिरला आणि गळा घोटला…, महिला अधिकाऱ्याला ड्रायव्हरनेच का संपवलं?

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा प्रश्न व्यवस्थित हाताळत योग्य मार्ग काढला आहे. जरांगेकडून 2 महिन्याची मुदत घेतली. आता सर्व व्यवस्थित ट्रॅकवर कायद्याच्या चौकटीत हा प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. असे असताना भुजबळांचे सभ्रम निर्माण करणारे विधान अयोग्य असल्याचे देसाईंनी म्हटले.

हे वाचलं का?

या प्रकरणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहोत आणि त्यांनी आमची भूमिका सांगणार आहोत. तसेच भुजबळांनीही त्यांची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडावी. अजित पवारांनी यात वेळीच लक्ष घालावे आणि अशाप्रकारे वक्तव्य टाळावीत. तसेच अशाप्रकारची भडक विधान करण्याची सवय भुजबळांना आहे. पण अशी विधाने करून त्यांनी परिस्थिती खराब करण्याचे प्रयत्न करू नये, असा सल्लाही शंभूराज देसाई यांनी भूजबळांना दिला. ओबीसी मंत्र्यांना जर टार्गेट करून त्यांच्यावर हल्ले होत असतील तर त्यांनी पुरावे द्यावेत, दोषींवर कारवाई होईल,असे देखील शंभूराज देसाई म्हणाले आहेत

हे ही वाचा :Shiv Sena : उद्धव ठाकरेंना म्हणाले ‘लुटारू’, उदय सामंतांचा व्यंगचित्रातून वार

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT