Maratha Reservation : ‘हल्ला झाला तेव्हा माझी पत्नी, मुलं…’, संदीप क्षीरसागरांनी सांगितलं हल्लेखोर कोण?
बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी राज्यमंत्री जय क्षीरसागर यांच्या घरांना आग लावण्यात आली होती. या घटनानंतर आता बीडमध्ये संचारबंदी लावण्यात आली होती. घराला आग लागल्याच्या या घटनेवर आता संदीप क्षीरसागर यांनी फेसबूक पोस्ट लिहून गंभीर आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
Maratha Reservation MLA Sandeep Kshirsagar Facebook Post : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पेटलाय. अनेक जिल्ह्यात शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बीड जिल्ह्यात सर्वांधिक हिंसक आंदोलने झाली. अनेक मंत्र्यांचे बंगले आणि पक्ष कार्यालये जाळल्याच्या घटना घडल्या. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी राज्यमंत्री जय क्षीरसागर यांच्या घरांना आग लावण्यात आली होती. या घटनानंतर आता बीडमध्ये संचारबंदी लावण्यात आली होती. घराला आग लागल्याच्या या घटनेवर आता संदीप क्षीरसागर यांनी फेसबूक पोस्ट लिहून गंभीर आरोप केला आहे. (maratha reservation sandeep kshirsagar facebook post on burn house incident manoj jarange patil beed news)
ADVERTISEMENT
आमदार संदीप क्षीरसागर यांनी 30 ऑक्टोबर 2023 ला घडलेल्या या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.फेसबूक पोस्ट लिहून संदीप क्षीरसागर यांनी काही गंभीर आरोप केले आहे. नेमकं संदीप क्षीरसागर फेसबूक पोस्टमध्ये काय म्हणाले आहेत, हे जाणून घेऊयात.
संदीप क्षीरसागर यांची फेसबूक पोस्ट जशीच्या तशी….
काल दि.30 ऑक्टोबर 2023 रोजी बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला. माझे मुल, पत्नी व सर्व कुटुंब यावेळी घरातच होते पण मतदारसंघातील व जिल्ह्यातील नागरिकांच्या व परमेश्वराच्या आशिर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली. अतिशय शांततेत व शिस्तीत सर्व आंदोलन करणारा माझा मराठा बांधव हिंसक आंदोलन करू शकणार नाही. काल जो प्रकार घडला तो मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसुन काही समाजकंटकांनी केला असावा. याबाबत आताच काही बोलणार नाही, तसेच योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेल.
हे ही वाचा : मोठी बातमी.. राज्यात ‘एवढ्या’ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित, पाहा सरकारचा जीआर!
मराठा आरक्षणासाठी मा.श्री.मनोजजी जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. त्यांच्या तब्येतीची माझ्यासह आपल्या सर्वांना काळजी आहे. सरकारने या बाबतीत तातडीने योग्य व सकारात्मक निर्णय घ्यायला हवा.
ADVERTISEMENT
सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीला सुरुवातीपासून मी पाठिंबा दिलेला असून शासन दरबारी पत्राद्वारे मी ही मागणी देखील केली होती. ही मागणी होऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावण्यासाठी मी देखील प्रयत्न करत राहणार आहे.
ADVERTISEMENT
आपला
संदिप क्षीरसागर
आमदार, बीड विधानसभा मतदारसंघ
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बीड
हे ही वाचा : Washim Crime : मुलाच्या ‘त्या’ सवयीने वैतागला, संतापलेल्या बापाने जागेवरच संपवलं
ADVERTISEMENT