फडणवीसांनी ओबीसी नेत्यांना सुनावलं, ‘मराठा आरक्षणात आम्ही सुवर्णमध्य…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maratha reservation we took the golden mean Fadnavis told OBC leaders exactly
Maratha reservation we took the golden mean Fadnavis told OBC leaders exactly
social share
google news

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांच्या मुलाच्या लग्नासाठी आले होते. यावेळी त्यांनी त्यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा ओबीसी (OBC reservation) समाजाला अश्वासन देत त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊच देणार नाही असं स्पष्टपणे सांगितले. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबरोरही आपण चर्चा करणार असल्याचे सांगितले.

ADVERTISEMENT

सगळ्या समाजाला न्याय देणार

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा आरक्षणाविषयी निर्णय घेतला. त्यानंतर मराठा आरक्षणावरून सरकारने तोंडाला पाणी पुसल्याचा आरोप केला जात होता. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काहीही केलं तरी टीका ही होतच असते. लोक टीका करत असतात, मात्र महाराष्ट्रातील सगळ्या समाजाला न्याय द्यायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा >> Pune Crime : प्रेम, संशय आणि हत्या, IT इंजिनियर गर्लफ्रेंडला लॉजवरच घातल्या गोळ्या

सोपी पद्धत केली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काहीही केलं तरी टीका ही होतच असते. लोकं टीका करत असतात परंतु, आपल्याला महाराष्ट्रातील सगळ्या समाजाला न्याय द्यायचा आहे. कालच्या निर्णयामध्ये ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे आवश्यकच होते. त्यामुळेच त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत केली आहे. त्यामुळे कालच्या निर्णयात कोणालाही वाटेकरी न करता ओबीसी समाजाला संरक्षण देऊन आरक्षण दिलं आहे. त्यामुळे कोणीही नाराज होणं गरजेचे नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

हे वाचलं का?

सर्वोच्च न्यायालयात टिकावं

ओबीसी समाजासह कोणत्याच समाजावर अन्यायच होऊ देणार नाही, कारण आम्ही सुवर्णमध्य काढला असून आम्ही छगन भुजबळ यांच्यासोबत चर्चा करून तोही प्रश्न सोडवू असंही सांगून या निर्णयामुळे कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केले. मागील वेळी जे आरक्षण देण्यात आलं होतं, ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने ज्या कारणांमुळे आरक्षण फेटाळले होते, त्या गोष्टीवरच चर्चा करून आणि विचार करून आता तो सर्व्हे सुरू केला असंही त्यांनी विश्वासाने सांगितले.

हे ही वाचा >> Maratha Reservation : जरांगे-पाटलांची पहिली मोठी घोषणा, ‘नोंदींच्या आधारे एक तरी…’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT