Chhagan Bhujbal : “आमचा समाज…”, भुजबळांचा शिंदे सरकारलाच गर्भित इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Minister Chhagan Bhujbal's Shinde government warning should not forget that our OBC community also votes
Minister Chhagan Bhujbal's Shinde government warning should not forget that our OBC community also votes
social share
google news

Maratha Reservation : मराठा समाजाच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला स्थगिती मिळाली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी जात प्रमाणपत्र असलेल्या व त्या प्रकारच्या नोंदी आढळून आलेल्या व्यक्तीच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केली  व शिंदे सरकारकडूनही ती मान्य करण्यात आली. त्यानंतर आज मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद घेत कालपासून मागासवर्गीय, दलित आणि इतर लोकांचे मेसेज येत असल्याचे सांगत पुढं काय करायचं विचारत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी सरकारला थेट इशारा देत आमचा समाज मतदान करतो की नाही हे सरकारनेही विसरू नये हे ठणकावून सांगितलं.

ADVERTISEMENT

इतर ठिकाणीही वाटेकरी

मंत्री छगन भुजबळ यांनी आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, आमचं आरक्षण संपलं अशी घबराट आहे. यामुळे शिक्षण आणि नोकरीमध्येही समावेश होणार असल्याने आता इतर ठिकाणीही वाटेकरी होणार असून पंचायतीत एक दोन जण निवडून येत होते ते पण जाणार अशी भीतीही ओबीसी समाजाकडून व्यक्त केली जाते आहे. ही भीती व्यक्त केली जात असली तरी या भावनेमध्ये तथ्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा >> Manoj Jarange: ‘ते वाया गेलेले लोक, जे सांगतील त्याच्या उलटं धरायचं’; पाटलांनी कोणाला हाणला टोला?

सगळ्यांना कामाला लावलं

सरकारच्या या निर्णयानंतर ओबीसी समाजाच्या भावना काय आहेत, या निर्णयानंतर ओबीसी बांधव काय निर्णय घेणार याबाबत बोलताना ते म्हणाले की, सर्वच मराठा समाजाला बॅक डोअर कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आहे. तसेच शिंदे समिती नेमून क्युरेटिव्ह पिटिशनबाबत काम चालू ठेवायचे आहे असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचे कामासाठी आता सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही कामाला लावल्याचे सांगत क्युरेटिव्ह पिटिशन दाखल होण्यासाठी आमचा पाठिंबा आहे पण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायची गरज काय असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

हे वाचलं का?

सरकारने हट्ट पुरवले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाविषयी बोलताना त्यांनी सरकारलालाही थेट आव्हान दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर निजामशाहीचा विषय उपस्थित झाला मात्र त्यानंतर सरकारनेही याबाबत सगळे हट्ट पुरवायला सुरुवात केल्याचा ठपका त्यांनी राज्य सरकारवर ठेवला आहे.

374 जातींना फटका

मराठा आरक्षणाचे सगळे हट्ट सरकारने पुरवले असले तरी 374 जातींना याचा फटका बसला आहे. एका निर्णयाचा परिणाम हा 374 जातींवर होणार असून त्यांचे प्रचंड नुकसान होणार असल्यामुळेच आमचा हा लढा सुरु असल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

मी माझी भूमिका मांडणार

राष्ट्रवादी पक्षानेही छगन भुजबळ यांच्या मराठा आरक्षणाविषयी चाललेल्या भूमिकेवर बोलताना ती भूमिका त्यांची वैयक्तिक असल्याचे म्हटले होते. त्यावरही भुजबळ यांनी सांगितले ही हो ही भूमिका माझी आहे. मग ती भूमिका पटो अथवा न पटो मी माझी भूमिका मांडणार कारण मी गेली 35 वर्षे लढतो आहे, त्यामुळे मी माझी भूमिका मांडत राहणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Lok Sabha Election 2024: ‘महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती…’; प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT