MLA Disqualification : आमदार अपात्रता निकालावर आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आता सुप्रीम कोर्टाकडून…’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mla disqualification result aditya thackerey first reaction on disqualiaficatiom result rahul narwekar maharashtra politics
mla disqualification result aditya thackerey first reaction on disqualiaficatiom result rahul narwekar maharashtra politics
social share
google news

Aditya Thackray Reaction on MLA Disqualification case: आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्य़क्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी जाहीर केला आहे. या निकालात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटाची घटना राहुल नार्वेंकर यांनी नियमबाह्य ठरवली आहे. तर शिंदेंची गटाची घटना ग्राह्य धरली आहे. त्यामुळे ठाकरेंना हा जोरदार झटका बसला आहे. आमदार अपात्रतेच्या या निकालावर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा निकाल अपेक्षित होता आणि यापेक्षा निर्लज्ज लोकशाहीची हत्या होऊच शकत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. (mla disqualification result aditya thackerey first reaction on disqualiaficatiom result rahul narwekar maharashtra politics)

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलत होते. यावेशी निकालावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुळ राजकीय पक्ष हा आपल्या अध्यक्षांनी त्यांना ट्रायब्युनल म्हणून दिला, त्यामुळे यापेक्षा निर्लज्ज लोकशाहीची हत्या होऊच शकत नाही,असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसेच देशासाठी हे मोठे संकेत आहेत. कारण 2024 मध्ये जर गद्दारी अशी लेजीटीमाईज झाली, घाणेरडे राजकारण लेजीटीमाईज झाले. आपलं सविधान भाजपला बदलायचंय. बाबासाहेब आंबेडकरांच संविधान त्यांना मान्य नाही आणि स्वत:च सविधान लिहायच हे या निकालावरून स्पष्ट होत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Big Breaking: ‘Shiv Sena ही शिंदेंचीच, व्हीपही..’, नार्वेकरांनी दिला ठाकरेंची झोप उडवणारा निकाल

तसेच इतके वर्ष राहुल नार्वेकर आमच्यात होते. त्यावेळी कुठच्या पक्षप्रमुखाचे ते आदेश घेत होते. एबी फॉर्म कुणाकडून घेत होते. हे तरी त्यांनी लक्षात ठेवं. लोकशाहीची ही दिवसा ढवळ्या निर्लज्ज हत्या झाली आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे आता मला वाटत उलट तपासणी खोके सरकारची जनता करेल, सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे, पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहे, असे देखील आदित्य़ ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. आपल्या देशात लोकशाही मारली गेली आहे. हिटलरशाही सुरु झाली आहे, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहे.

हे ही वाचा : MLA Disqualification: शिंदेंचा निकाल ठरवणार अजित पवारांचं भविष्य

निकालावर बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, निवडणूक आयोगानं दिलेली घटना मी ग्राह्य धरतो, ठाकरे गटानं केलेली घटनादुरुस्ती ही नियमबाह्य आहे. तर 2023 मध्ये शिंदे गटाने दिलेली घटना मी ग्राह्य धरतो, असे सांगितले आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT