Big Breaking: ‘Shiv Sena ही शिंदेंचीच, व्हीपही..’, नार्वेकरांनी दिला ठाकरेंची झोप उडवणारा निकाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

mla disqualification shinde faction emerge as the real shiv sena party rahul narwekar gave a verdict that shocked uddhav thackeray
mla disqualification shinde faction emerge as the real shiv sena party rahul narwekar gave a verdict that shocked uddhav thackeray
social share
google news

MLA Disqualification Verdict Rahul Narwekar: मुंबई: शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर सर्वात मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे गेली दोन वर्षांहून अधिक सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर पडदा पडला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार खरा विधिमंडळ पक्ष कोणता आणि नेमका व्हीप कोणाचा यावर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायचा होता. ज्यावर प्रदीर्घ सुनावणी पार पडल्यानंतर आज (10 जानेवारी) राहुल नार्वेकर यांनी आपला निर्णय जाहीर केला. ज्यामध्ये त्यांनी शिवसेना हा मूळ राजकीय पक्ष शिंदेंचाच असल्याचा निर्णय दिला. याशिवाय व्हीप म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली. राहुल नार्वेकरांचा हा निर्णय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जता आहे. (mla disqualification shinde faction emerge as the real shiv sena party rahul narwekar gave a verdict that shocked uddhav thackeray)

ADVERTISEMENT

याबाबतचा निकाल देताना राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं की, ‘मूळ राजकीय पक्ष म्हणून मी शिंदे गटाला मान्यता देतो. तसेच एकनाथ शिंदेंनी प्रतोद (व्हीप) म्हणून भरत गोगावले यांची जी नियुक्ती केली होती ती बरोबर आहे. त्यामुळे त्यांचाच व्हीप हा योग्य होता. त्यामुळे विधिमंडळ पक्ष ज्यांचा त्याचाच मूळ पक्ष असेल.’ असं म्हणत नार्वेकरांनी शिवसेना पक्ष हा शिंदेंचाच आहे यावर शिक्कामोर्तब केलं.

हे ही वाचा>> MLA Disqualification: कोणाच्या मनातही नसेल असा निकाल देणार नार्वेकर.., मोदी-शाहांसारखं वापरणार धक्कातंत्र?

‘खरी शिवसेना शिंदेंचीच..’ वाचा नार्वेकरांच्या निकालातील महत्त्वाचे निर्णय

  • Shiv Sena MLA Disqualification: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून निकालाचं वाचन सुरू
  • Shiv Sena MLA Disqualification: खरी शिवसेना कोणती? आणि व्हीप कोण?, हा माझ्यासमोर मुद्दा होता.
  • Shiv Sena MLA Disqualification: घटना, नेतृत्व आणि विधिमंडळ बहुमत, पक्ष ठरवताना हे घटक महत्त्वाचे
  • Shiv Sena MLA Disqualification: दोन्ही बाजूंपैकी राजकीय पक्ष कोण हे आधी ठरवणार
  • Shiv Sena MLA Disqualification: निवडणूक आयोगानं घटनेची एक प्रत दिली पण त्यावर तारीख नाही. म्हणून शिवसेनेने जी घटना दिली, ती मान्य नाही.. दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. 2018 ला पक्षाच्या घटना जी दुरुस्ती करण्यात आली ती चूक आहे.
  • Shiv Sena MLA Disqualification: निवडणूक आयोगानं दिलेली घटना मी ग्राह्य धरत, ठाकरे गटानं केलेली घटनादुरुस्ती ही नियमबाह्य.. 2023 मध्ये शिंदे गटाने दिलेली घटना मी ग्राह्य धरतो.
  • Shiv Sena MLA Disqualification: उलट तपासणीला आले नाहीत, म्हणून ठाकरे गटाचं प्रतिज्ञापत्र अमान्य. 10 व्या सूचीनुसार मला फक्त राजकीय नेतृत्वच पाहायचं आहे.
  • Shiv Sena MLA Disqualification: 2013 आणि 2018 रोजी पक्षांतर्गत निडणूक झाली नाही, म्हणून ती घटना चुकीची..
  • Shiv Sena MLA Disqualification: खरी शिवसेना कोण, हे ठरवण्याचा अधिकार मलाच..
  • Shiv Sena MLA Disqualification: खरी शिवसेना आणि शिवसेनेच्या घटनेवरुनच ठरणार, नेते आणि पदांची रचना यावरून खऱ्या पक्षाचा निर्णय होणार
  • Shiv Sena MLA Disqualification: पक्षप्रमुखाचं मत याच्याशी मी सहमत नाही, पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असणार, पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत
  • Shiv Sena MLA Disqualification: शिवसेना पक्षप्रमुख कोणालाही पदावरून काढू शकत नाहीत, उद्धव ठाकरेंनी धरलेला निर्णय ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंची हकालपट्टी मान्य करता येत नाही
  • Shiv Sena MLA Disqualification: शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून काढू शकत नाही, असं झालं तर पक्षातला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही, पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक
  • Shiv Sena MLA Disqualification: उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदावरून हटविण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचा दावा मान्य करता येणार नाही. त्यांच्या गटाचा व्हीपही वैध नाही. पक्षांतरविरोधी कायद्यातील तरतुदींचाही दहाव्या अनुसूचीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. एखाद्या पक्षात नेतृत्वाबाबत वाद निर्माण झाल्यास नेतृत्व रचनेकडे पाहिले जाते. उद्धव ठाकरे गटाला नेतृत्व रचनेचा पाठिंबा नव्हता.
  • Shiv Sena MLA Disqualification: 2018 च्या निवडणुकीतही उद्धव ठाकरेंना नेतृत्व रचनेचा पूर्ण पाठिंबा नव्हता. दोन्ही गटांचे पक्षावर वर्चस्व आणि नेतृत्वाचे दावे होते. पक्षाची घटना नेतृत्व रचनेवरून निर्माण होणारे वाद सोडवण्याचे साधन म्हणून काम करते. त्यावेळीही ठाकरे गट योग्य पुरावे समोर आणू शकला नाही.
  • Shiv Sena MLA Disqualification: महेश जेठमलानी यांनीही आपल्या युक्तिवादात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय सर्वोच्च आणि सर्वत्र मान्य असल्याचे सांगितले. 25 जून 2022 रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात मंजूर झालेल्या सात ठरावांमध्ये फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांनाही माझ्यासमोर आणले. त्यावर संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजेच प्रतिनिधीगृहाऐवजी केवळ सचिव विनायक राऊत यांनी स्वाक्षरी केली होती. राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य नसलेल्या राहुल शेवाळे यांनी अरविंद यांच्यासाठी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ही कागदपत्रे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही.
  • Big Breaking: मोठी बातमी… उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता देतो.., विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केला सर्वात मोठा निर्णय
  • Big Breaking: एकनाथ शिंदेंनी प्रतोद (व्हीप) म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती ही बरोबर, त्यांचाच व्हीप योग्य, नार्वेकरांनी दिला मोठा निर्णय
  • Big Breaking: विधिमंडळ पक्ष ज्यांचा त्याचाच मूळ पक्ष

हे ही वाचा>> Mla Disqualification : ‘अध्यक्षांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे’; CM शिंदे स्पष्टच बोलले

यानुसार आता शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यातही मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT