आमदार अपात्रतेबाबतच्या हालचालींना वेग, राहुल नार्वेकरांनी दिले मोठे संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

mla disqualification Vidhansabha Speaker rahul narvekar visited delhi to discuss proceedings regarding
mla disqualification Vidhansabha Speaker rahul narvekar visited delhi to discuss proceedings regarding
social share
google news

Rahul Narvekar : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आमदार अपात्रतेचा मुद्दा प्रचंड गाजला. त्यानंतर आज पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेला आला आहे कारण, आमदार अपात्रतेबाबत (MLA Disqualification) काय कार्यवाही केली हे सांगण्यासाठी 4 दिवस बाकी असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी अचानक दिल्ली दौरा केला. त्यानंतर ते पुन्हा मुंबईला परतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आमदार अपात्रबाबत अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे. यावेळी त्यांनी आपला दिल्ली दौरा पूर्वनियोजित होता असंही त्यांनी यावेळी सांगितेल. (Vidhansabha Speaker rahul narvekar visited delhi to discuss proceedings regarding mla disqualification)

ADVERTISEMENT

अचानक दिल्लीला रवाना

आमदार अपात्रतेबाबत काय कार्यवाही केली हे सांगण्यासाठी चार दिवस बाकी आहेत. त्याआधीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वकिलांबरोबर सल्लामसलत केली होती. त्यानंतर ते तात्काळ दिल्लीला रवाना झाले. दिल्ली दौऱ्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितेल की, पक्षश्रेष्ठी आणि तज्ज्ञ विधितज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी ही दिल्ली भेट होती असंही त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा >> नरेंद्र मोदींनी ओबीसींसाठी नेमकं केलं काय? राहुल गांधींनी पंतप्रधानांना घेरले

वकिलांशी सल्लामसलत

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौऱ्याची माहिती देताना ते म्हणाले की, या दौऱ्यात अनेक भेटीगाठी ठरलेल्या होत्या. आमदार अपात्रतेसंदर्भात माहिती घेण्यासाठी आणि विधितज्ज्ञांबरोबर चर्चा करण्यासाठी ही दिल्ली भेट होती. दाखल केली गेलेली याचिका आणि त्यामध्ये दिलेले निर्देशाविषयी माहिती घेण्यासाठी तसेच त्याबाबत चर्चा करण्यासाठी वकिलांचे मार्गदर्शन घेतले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> चांद्रयान 3 ची मोठी बातमी, सिग्नलबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

परिस्थितीनुसार कायद्यात बदल

आमदार अपात्रतेसंदर्भातला जो कायदा करण्यात आला आहेय. त्यामध्ये सातत्याने बदल होत असतात. त्यामुळे त्यामध्ये अजून काही संशोध करण्याची गरज आहे का ? त्याची अंमलबजावणी करायची झाली तर ती योग्यरित्या कशी करायची याबाबतही दिल्ली भेटीत चर्चा करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT