‘अजित पवार आता गप्प बसा’,राज ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

mns raj thackeray draw ajit pawar cartoon and advised
mns raj thackeray draw ajit pawar cartoon and advised
social share
google news

Raj Thackeray draw Ajit Pawar cartoon : पुणे प्रतिनिधी : वाय.बी.सेंटरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष समितीच्या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) यांचा राजीनामा एकमताने फेटाळून लावण्यात आला. या निर्णय़ानंतर अजित पवारांची (Ajit Pawar) कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. असे असतानाच आता राज ठाकरे यांनी चक्क विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे व्यंगचित्र काढल्याची घटना घडलीय. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी ”गप्प बसा” असा सल्ला देखील दिला आहे. एकीकडे राष्ट्रवादीत उलथापालथ सुरु असताना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिलेला हा सल्ला खुप चर्चेचा विषय ठरतोय. (mns raj thackeray draw ajit pawar cartoon and advised keep quite)

ADVERTISEMENT

जागतिक व्यंगचित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सव 2023 चे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी सर्व व्यंगचित्र पाहून कलाकार मंडळींच कौतुक देखील यावेळी केले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यंगचित्र काढण्याचा आग्रह धरला होता. यावेळी राज ठाकरे यांनी गेली दोन चार दिवस जे काही चालल आहे.ते पाहून अजित पवार यांच चित्र काढण्याचा प्रयत्न करतो.मला ते कितपत येईल ते माहिती नाही, असे त्यांनी उपस्थितीताना सांगितले.

हे ही वाचा : “शरद पवारांनी अजित पवारांना मामा बनवलं”, निखील वागळेंचं स्फोटक विश्लेषण

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावेळी केवळ तीन मिनिटात अजित पवार यांच व्यंगचित्र काढलं होतं आणि ते पूर्ण होताच, आता पुढे काय लिहू ‘आता गप्प बसा’ अस राज ठाकरे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हषा पिकला होता. यावर आता अजित पवार काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अजित पवारांना मनसे सल्ला

दरम्यान लोकमतवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुलाखत पार पडली होती. खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राज ठाकरे यांना रॅपिड फायरमध्ये अजित पवार यांचे नाव आले होते. यावर राज ठाकरे यांनी, मला माझ्या 5 तारखेच्या सभेवर यावर सविस्तर बोलायचंय, मला एका वाक्यात नाही बोलायचं. बाहेर जितकं लक्ष देताय तितकं काकांकडे ही द्या,असा सल्ला त्यांनी अजित पवार यांना दिला होता. या सल्ल्यानंतर, ठीक आहे राज ठाकरेंनी जसे त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवले तितकं मी पण ठेवेण, असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले होते.

हे ही वाचा : शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळला! बैठकीत काय झालं?

 

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT