Modi Surname case : ज्यांच्या तक्रारीमुळे राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा ‘ती’ व्यक्ती आहे तरी कोण?

मुंबई तक

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे एक विधान त्यांच्यासाठी बरेच अडचणीचे ठरले आहे. 2019 मध्ये राहुल गांधी यांनी कर्नाटकातील एका निवडणूक रॅलीत भाषण देताना म्हणालेले की, ‘सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असतं?’

ADVERTISEMENT

know who is purnesh modi on whose petition rahul gandhi
know who is purnesh modi on whose petition rahul gandhi
social share
google news

Who is Purnesh Modi: सुरत: ‘सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असतं?’ असं वक्तव्य करून वाद ओढावून घेणारे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे आता कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. आता या प्रकरणात गुरुवारी न्यायालयाने (Court) राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मात्र, असं असलं तरीही त्यांना लागलीच जामीनही मिळाला आहे. हे संपूर्ण प्रकरण हे गुजरातमधील भाजप आमदार पूर्णेश मोदी (Purnesh Modi) यांच्यामुळे घडलं आहे. कारण त्यांच्याच तक्रारीनंतर कोर्टात खटला दाखल झाला आणि त्याच प्रकरणी राहुल गांधींना शिक्षा झाली आहे. अशावेळी राहुल गांधी यांच्यासोबतच पूर्णेश मोदी यांचीही आता चर्चा चालू आहे, चला तर जाणून घेऊया कोण आहेत पूर्णेश मोदी? (modi surname case know who is purnesh modi on whose petition rahul gandhi was sentenced to two years)

  • नाव : पूर्णेश मोदी
    जन्मतारीख: 22 ऑक्टोबर 1965
    जन्म ठिकाण : सुरत
    वैवाहिक स्थिती: विवाहित
    पत्नीचे नाव : श्रीमती बिनाबेहन
    राज्याचे नाव: गुजरात
    शिक्षण: पदवी, बीकॉम, एलएलबी
    पक्षाचे नाव: भारतीय जनता पार्टी
    मतदारसंघ : सुरत पश्चिम
    व्यवसाय : वकील

सुरतच्या अडाजन भागात पूर्णेश मोदी कुटुंबासह राहतात. गुजरातच्या तेराव्या विधानसभेची (2013-17) पोटनिवडणूक जिंकून ते प्रथमच संसदेत पोहोचले होते. खरं तर 2013 साली तत्कालीन आमदार किशोर भाई यांचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यानंतर पोटनिवडणूक झाली तेव्हा भाजपने पूर्णेश मोदींना उमेदवारी दिली होती आणि त्यांनी त्या पोटनिवणडुकीत विजयही मिळवला होता.

Modi Surname case : राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; ‘मोदी’ प्रकरण काय?

त्यानंतर 2017 च्या विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा पूर्णेश मोदी हे एकमेव भाजपचे उमेदवार होते. निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजयाचा झेंडा फडकवला. पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा मुळात सुरतमधील लोकांचा प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जातो.

पूर्णेश मोदी यांनी 12 ऑगस्ट 2016 ते 25 डिसेंबर 2017 या कालावधीत गुजरात सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीचे सदस्य म्हणून संसदीय सचिवाची भूमिका पार पाडली होती.

याआधी ते सुरत महापालिकेचे नगरसेवक होते. 2000-05 मध्ये ते महापालिकेच्या सभागृहात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नेते होते. याशिवाय ते 2009-12 आणि 2013-16 मध्ये सुरत नगर भाजपचे अध्यक्षही राहिले आहेत.

Rahul Gandhi 8 वर्ष लोकसभेत दिसणार नाहीत? काय आहे कारण, वाचा सविस्तर

2017 च्या विधानसभा निवडणुकीत पूर्णेश मोदींना 1 लाख 11 हजार 615 मते मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार इक्बाल दाऊद पटेल यांना केवळ 33 हजार 733 मते मिळाली होती.

विधानावरून वाद

राहुल गांधी यांनी कर्नाटकबाबत केलेल्या वक्तव्याबाबत गुजरातच्या सुरत सत्र न्यायालयात खटला सुरू होता. राहुल यांचे हे विधान संपूर्ण मोदी समाजाचा अपमान असल्याचे सांगत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. ज्याचा आता निकाल आला असून राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp