NCP च्या 7 आमदारांनी सोडली शरद पवारांची साथ, अजित पवारांना पाठिंबा!
नागालॅंडचे 7 आमदारांचा अजित पवार गटाला पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.याचसोबत वान्युंग ओडियो यांनी समर्थन देत असल्याचे पत्र देखील प्रफुल पटेल यांच्याकडे सोपवले आहे. त्यामुळे अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी एकसंध रहावी यासाठी उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाकडून शरद पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाला आता आणखीण 7 आमदारांनी पाठिंबा दर्शवला आहे.त्यामुळे अजित पवार गटाची ताकद आणखीणच वाढली आहे. यासोबत शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान हे सात आमदार कोण आहेत? हे जाणून घेऊय़ात. (nagaland ncp 7 mlas support ajit pawar sharad pawar maharashtra politics)
ADVERTISEMENT
पावसाळी अधिवेशनात अजित पवार गटाला 15 आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता आणखीण 7 आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे. हे 7 आमदार नागालॅंडचे आहेत. नागालँडच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष वान्युंग ओडियो यांनी गुरूवारी अजित पवार गटाला समर्थन देत असल्याचे पत्र दिले होते. वान्युंग ओडियो यांनी गुरूवारी दिल्लीत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत नागालॅंडचे 7 आमदारांचा अजित पवार गटाला पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.याचसोबत वान्युंग ओडियो यांनी समर्थन देत असल्याचे पत्र देखील प्रफुल पटेल यांच्याकडे सोपवले आहे. त्यामुळे अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे.
हे ही वाचा: IrshalWadi Landslide : ‘माझे तर सगळेच मेले’, वन विभागामुळे इर्शाळवाडी गेली मृत्यूच्या जबड्यात!
नागालैंड @NCPSpeaks1 की संपूर्ण प्रदेश कार्यकारिणी व जिलों के पदाधिकारियों ने पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री. @AjitPawarSpeaks जी व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्री. @praful_patel जी के नेतृत्व में काम करते हुए नागालैंड में पार्टी को अधिक मजबूत करने का निर्धार आज व्यक्त किया। pic.twitter.com/H6i39nAUzr
— NCPspeaks_Official (@NCPSpeaks1) July 20, 2023
हे वाचलं का?
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रजमोहन श्रीवास्तव म्हणाले की, आज नागालॅंडचे प्रदेशाध्यक्ष वान्युंग ओडियो यांनी नवी दिल्लीत येऊन राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल व खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन नागालॅंड राष्ट्रवादी कॉग्रेस कार्यकारिणीच्या निर्णयाची माहिती देत सात आमदांरासह पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे सुपूर्द केली.
नागालॅंडमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली होती. या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी विजय मिळवला होता. नामरी नचांग, पिक्टो, एस तोईहो येप्थो, वाय. म्होंबेमो हूमत्सो, वाय. मानखा ओकोन्याक, ए पोंगशी फोम आणि पी लॉन्गॉन ही अशी या आमदारांची नावे आहेत. या सातही आमदारांनी आता अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा: सिंगल बेडरूम, 500 रूपये भाडे आणि 7 दिवसाचा मुक्काम, काठमांडू्च्या हॉटेलमधली संपूर्ण कहाणी?
दरम्यान नागालॅंडच्या विधानसभा निवडणूकीत भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या. तर नॅशनल डेमोक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पार्टीने सर्वाधिक 25 जागा जिंकल्या हो्त्या. या दोन्ही पक्षानी मिळून सरकार स्थापन केले होते. या सरकारला राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दर्शवला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT