ठाकरेंचे आठ आमदार आमच्या संपर्कात; भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा दावा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

narayan rane big statement on udhhav thackeray shivsena mlas leave thackeray shivsena maharashtra politics
narayan rane big statement on udhhav thackeray shivsena mlas leave thackeray shivsena maharashtra politics
social share
google news

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता निकालात ‘शिंदे गटच खरी शिवसेना’ असल्याची मान्यता दिली होती. यासोबतच दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं. अध्यक्षांच्या निकालाने ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. या निकालानंतर अनेक आमदार ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. अखेर या चर्चेवर एका भाजप नेत्याने शिक्कामोर्तब केले आहे. भाजप नेत्याने ठाकरेंचे 8 आमदार संपर्कात असल्याचे विधान केले आहे.त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. (narayan rane big statement on udhhav thackeray shivsena mlas leave thackeray shivsena maharashtra politics)

ADVERTISEMENT

आमदार अपात्रतेचा निकाल विरोधात आल्यानंतर ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस झाली होती. पक्षाच्या बैठकीत देखील अनेक नेत्यांनी या निकालाचे खापर काही ज्येष्ठ नेत्यांवर फोडले होते. त्यामुळे या निकालानंतर काही आमदार ठाकरेंची साथ सोडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. अखेर या चर्चावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठं विधान केले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतले 8 आमदार आमच्या संपर्कात असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतले 8 आमदार फुटण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : Ayodhya Ram Mandir: कोण आहेत हे 4 शंकराचार्य? राम मंदिरावेळीच त्यांची का होतेय चर्चा?

नारायण राणे काय म्हणाले?

नारायण राणे शनिवारी पालघर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांना सांगितले की, उद्धव ठाकरेची शिवसेना आता संपली आहे. त्याच्या पक्षात उरलेले 16 त्यातले 8 आमच्याकड़े सर्विस टाकतायत येतील, असे विधान नारायण राणे यांनी केले आहे. तसेच ठाकरेंनी कल्याण मतदार संघावर दावा सांगितला होता. यावर राणे म्हणाले, कल्याण डोंबिवली मतदार संघ हा कोणाची जहागीर नाही.सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर भाजपच लढणार असून हा मतदार संघ भाजपचा असल्याने नीलेश राणे या लोकसभा मतदार संघ लढला होता आणि खासदारही झाला होता असे ठाम मत नारायण राणे यांनी व्यक्त केले.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रपतींना द्रौपदी मुर्मूना आमंत्रण द्या,अशी मागणी केली होती. यावर नारायण राणे म्हणाले,कोण उद्धव ठाकरे, ते क़ाय माझे मार्गदर्शक आहेत का? त्यांना कोण विचारते? घरी बसला आहे बस मातोश्रीमधे बिनकामाच्या माणसाचा प्रश्न मला विचारु नका असा खोचक टोला नारायण राणे यांनी यावेळी लगावला आहे.

हे ही वाचा : Crime : नवी मुंबई हादरलं! बिल्डराला कार्यालयात घुसून संपवलं, नेमकं काय घडलं?

दरम्यान नारायण राणे यांनी दावा केल्याप्रमाणे जर 8 आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. तर ठाकरेंसाठी हा मोठा धक्का बसणार आहे. आता ठाकरेंचे आमदार त्यांची साथ सोडतात का? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT