Lok Sabha 2024 : “नवरीचा पत्ता नाही, नवरा…”, राणेंनी इच्छुकांचे टोचले कान
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्रपक्षांना आवाहन केले. त्याचबरोबर जे नेते लोकसभा निवडणुकीसाठी दावेदारी करत आहेत, त्यांनाही सुनावलं.
ADVERTISEMENT
Lok Sabha Election 2024, Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर महायुतीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी तिळगूळ मेळावे घेतले जात आहे. याच मेळाव्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या मित्रपक्षातील नेत्यांचे कान टोचले. (Union Minister Narayan Rane Speech in Mahayuti Melava)
ADVERTISEMENT
सिंधुदुर्ग येथे महायुतीचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उमेदवारी मिळण्यासाठी बॅनर, पोस्टर्स लावून शक्तिप्रदर्शन करणाऱ्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे सुनावले.
लोकसभा निवडणूक २०२४ : इच्छुक उमेदवारांना राणे काय बोलले?
महायुतीच्या मेळाव्यात बोलताना राणे म्हणाले, “प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आपापल्या नेत्यांना सांगावं की, निवडणुकीआधी पोस्टरबाजी, बॅनरबाजी करू नका. नाव जाहीर झाले की, आपण पोस्टर, बॅनर लावू, पण आता नको; ते योग्य नाही. अजून नवरीचा पत्ता नाही आणि नवरा मुंडावळ्या बांधून फिरतोय, हे योग्य नाही”, अशा शब्दात राणेंनी कान टोचले.
हे वाचलं का?
हेही वाचा >> “भाजपने वापरुन घेण्याची भाषा करू नये, नाहीतर गेम करू”, कडूंनी आवाज वाढवला
दीपक केसरकर, अदिती तटकरे उपस्थित असलेल्या या मेळाव्यात पुढे बोलताना राणे म्हणाले, “महायुतीचा जो कुणी उमेदवार असेल, त्याचं काम करायचं आहे. आपापसात तिन्ही पक्षात मतभेद, गैरसमज होतील, असं कुणीही वागू नका. तिन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांची उणीदुणी काढू नये. लोकसभा निवडणूक झाली की आपण मैदान घेऊन बोलू”, असे राणे म्हणाले.
हेही वाचा >> “जर मोदी म्हणाले की, काँग्रेस चांगला पक्ष तर…”, देवरांचा ठाकरे-काँग्रेसवर वार
कुणाचा गणपती, कुणाचा हनुमान”
राणे म्हणाले, “कुणाच्या मनातलं सांगता येत नाही. आम्हीही आमच्या मनात कुणाचा गणपती करायचा आणि कुणाचा हनुमान करायचा हे ठरवलं आहे. आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. आपल्या उमेदवाराचा पराभव आपलेच लोक करतात, पण आपल्याला खासदारकीची निवडणूक जिंकायची आहे. महायुतीचा जो कुणी उमेदवार असेल, त्याला त्याला निवडून आणायचं आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी आणि रायगड या जागा आपल्याला निवडून आणायच्या आहेत”, असे राणे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT