Sanjay Raut : ‘राष्ट्रवादीच्या पे रोलवर काम करणाऱ्यांनी…’, शिंदेंच्या नेत्याचा राऊतांवर पलटवार
शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली होती. त्यासाठी संजय राऊत यांचे वडिलही आले नव्हते,असा टोला नरेश म्हस्के यांनी राऊतांना लगावला आहे. तसेच राऊत ज्यावेळेस शिवसेनेत होते, तेव्हा ते साधे संपादकच होते ना? अशी खिल्ली देखील मस्के यांनी यावेळी उडवली.
ADVERTISEMENT
Naresh Mhaske Reply Sanjay Raut :उद्धव ठाकरेंकडे ज्यावेळेस शिवसेना आली, तेव्हा एकनाथ शिंदे नगरसेवक होते,असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं होते. यावर आता शिंदेंचे नेते म्हणजेचे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आता संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली होती, संजय राऊतांचे वडील आले नव्हते, असा पटलवार आता नरेश म्हस्के यांनी केला आहे. (naresh mhaske reply sanjay raut criticize cm eknath shinde dasara melava maharashtra politics)
ADVERTISEMENT
दसरा मेळाव्यावरून (Dasara Melava) शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने असतानाच, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी डिवचणारे विधान केले होते. राऊतांच्या या विधानावर आता नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली होती. त्यासाठी संजय राऊत यांचे वडिलही आले नव्हते,असा टोला नरेश म्हस्के यांनी राऊतांना लगावला आहे. तसेच राऊत ज्यावेळेस शिवसेनेत होते, तेव्हा ते साधे संपादकच होते ना? अशी खिल्ली देखील मस्के यांनी यावेळी उडवली.
हे ही वाचा : Deoria : पती-पत्नी, दोन मुली आणि मुलाचा चिरला गळा, झाडल्या गोळ्या; कारण…
बाळासाहेब ठाकरे हे तमाम शिवसैनिकांना पित्यासमान आहेत. बाळासाहेबांचा वारसा रक्ताने आमच्याकडे आलेला नसला तरी विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीचे तळवे चाटणे हा शिवसेनेचा धर्म कधीच नव्हता. त्यामुळे अशा चाटूबहाद्दरांनी शिवसेना आमचीच ही भाषा करू नये,अशी टीका देखील नरेश म्हस्के यांनी केली. मुख्यमंत्री मागे म्हणाले होते, हिऱ्यापोटी गारगोटी जन्माला आली होती. मी म्हणतो सुर्यापोटी मेणबत्ती जन्माला आलेली आहे, अशी खिल्ली देखील नरेश मस्के यांनी संजय राऊतांची उडवली आहे.
एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाढविण्यासाठी रक्ताचे पाणी केले आहे. त्यामुळेच आज त्यांच्यासोबत 40 आमदार, 13 खासदार आणि लाखो शिवसैनिक आहेत. संजय राऊतांनी काय दिवे लावले आहेत ? राष्ट्रवादीच्या पे रोलवर काम करून शिवसेना संपविणे हाच त्यांचा एकमेव अजेंडा असल्याची टीका नरेश म्हस्के यांनी केली.
संजय राऊतांची एका नगरसेवकाला तरी निवडून आणायची लायकी आहे का? त्यांना खासदार होण्यासाठी सुध्दा शिंदेची मदत घ्यायला लागणार आहे. त्यामुळे अशा बांडगुळांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली. तसेच दसरा मेळावा घेण्याची परंपरा शिवसेनेची आहे. त्यामुळे तो मेळावा घेण्याचा अधिकार आमचाच असल्याचा दावा देखील नरेश म्हस्के यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Washim : अंघोळ करताना सोनं काढलं अन् गायब झालं, म्हशीच्या पोटात कसं सापडलं?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT