NCP : ‘अपात्र का करू नये?’, शरद पवारांच्या 8 नेत्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार!

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

ncp crisis latest news : ajit pawar faction demands disqualification of 8 mla of sharad pawar faction.
ncp crisis latest news : ajit pawar faction demands disqualification of 8 mla of sharad pawar faction.
social share
google news

Ncp Crisis Latest, Sharad Pawar vs Ajit Pawar : शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू आहे. अजित पवारांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देत बंड केलं. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावरही दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही गटातील राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. त्यातच आता शरद पवार यांच्या गटातील 8 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. आपल्याला अपात्र का करू नये, असा सवाल या 8 नेत्यांना केला गेला असून, त्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आली आहे. (Maharashtra Assembly secretariat sends notices to 8 MLAs of Sharad pawar faction)

ADVERTISEMENT

राज्यातील दोन प्रादेशिक पक्षांची दोन शकलं झाली आहेत. आधी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला एकनाथ शिंदे यांनी आव्हान दिलं. शिंदेंनी बंडाचं निशाण फडकावलं आणि भाजपसोबत राजकीय घरोबा केला. त्याचबरोबर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हही मिळवलं. शिवसेनेची सूत्रं शिंदेंकडे जात नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी बंड केलं. पवारांना बाजूला सारत अजित पवारांनी भाजपसोबत युती केली आणि उपमुख्यमंत्री झाले.

हे ही वाचा >> Meera Borwankar Ajit pawar : “तू मला सोडून गेलास, मी तुला सोडणार नाही”

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (अजित पवार विरुद्ध शरद पवार) सध्या पक्षासाठी झुंजताना दिसत आहे. त्यातच आता अजित पवार गटाने शरद पवारांच्या बाजूने असलेल्या 8 आमदारांविरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यासंदर्भात आता विधिमंडळ सचिवालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

शरद पवारांच्या 8 आमदारांना अपात्रतेसदंर्भात नोटिसा?

अजित पवार गटाने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका 8 आमदारांवर ठेवला. आपल्याला अपात्र का करू नये, अशी याचिका अजित पवार गटाने दाखल केली होती. याचसंदर्भात विधिमंडळ सचिवालयाने नोटीसा पाठवल्या आहेत. त्यामुळे अपात्रतेसंदर्भात अजित पवार गटाकडून आतापर्यंत शरद पवार गटातील दहा आमदारांना नोटीस दिल्या गेल्या आहेत.

अपात्रतेसंदर्भात नोटीस देण्यात आलेले ते आमदार कोण?

शरद पवार गटातील अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, संदीप क्षीरसागर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजाण्यात आली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> MLA Disqualification: ‘2 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश द्यावे लागतील..’, कोर्टाने नार्वेकरांना झापलं!

या आमदारांबद्दल भूमिका अस्पष्ट

अजित पवार गटाने शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या 10 आमदारांना नोटीस दिली आहे. मात्र, तीन आमदार असे आहेत, ज्यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट केलेली नाही. अशोक पवार, मानसिंग नाईक आणि नवाब मलिक अशी या आमदारांची नावे आहेत. अशोक पवार आणि मानसिंग नाईक हे शरद पवार गटात आहेत. पण, नवाब मलिकांनी अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT