शरद पवारांच्या मनात काय? जयंत पाटलांनी सांगितली 2019 ची स्टोरी; म्हणाले,…

मुंबई तक

ADVERTISEMENT

NCP Leader Jayant Patil in Mumbai Tak Baithak on NCP Chief Sharad Pawar stand
NCP Leader Jayant Patil in Mumbai Tak Baithak on NCP Chief Sharad Pawar stand
social share
google news

मुंबई : विधानसभेच्या 2019 च्या निकालानंतर संख्या मर्यादित होते. त्यामुळे गणित एकत्र करण्यासाठी सगळेच बेरीज करत होते. सामान्य माणसांचं देखील मत होतं की, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुमत होतं आहे सरकार बनवावं. त्यानुसार महाविकास आघाडी सरकार बनलं. त्याच्या दुसऱ्या बाजूला पडद्याआड कोण बोललं, कोणाशी चर्चा झाली याबाबत मला कल्पना नाही. पवार साहेब किंवा भाजपची चर्चा झाली असावी असं मला वाटतं नाही. त्यानंतर पवार साहेबांनी शेवटपर्यंत महाविकास आघाडीसोबतची कमिटमेंट पूर्ण केली, अजूनही आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत, असं म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी 2019 च्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीविषयी भाष्य केलं. (NCP Leader Jayant Patil in Mumbai Tak Baithak on NCP Chief Sharad Pawar stand)

ADVERTISEMENT

राज्यातील राजकारणातील दिग्गज आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ‘मुंबई Tak बैठक’ पार पडत आहे. यात सकाळी 9 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पहिले सत्र पार पडले. त्यानंतर साडे अकरा वाजता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये तिसरे सत्र पार पडले. यावेळी जयंत पाटील बोलत होते. सध्याच्या सरकारचे काम, विरोधकांची एकजूट, महाविकास आघाडीतील धुसफूसविषयीच्या चर्चा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विविध विषयांवरील भूमिका या पार्श्वभूमीवर पाटील आणि चव्हाण यांच्या सत्रात चर्चा झाली.

‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य’; देवेंद्र फडणवीसांचं ‘मुंबई Tak बैठक’मध्ये मोठं भाकित

जयंत पाटील काय म्हणाले?

भाजपच काँग्रेसीकरण आणि राष्ट्रवादीकरण चालू आहे. आमच्यातून गेलेले पहिल्या बाकावर आहेत आणि मुळचे भाजपवासी मागील बाकावर आहेत. विरोधी पक्षांचं अस्तित्व मान्य करणं हा साधा विवेक ठेवला तरी लोकशाही व्यवस्थित चालू शकते. विरोधक शत्रु आहे हे मानणं चुकीचं आहे. २०१९ मध्ये माणूस थांबायला तयार नव्हता. पण यामुळे भारतीय जनता पक्षाचे रेटिंग खाली गेले आहे, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

यामध्ये आघाडीतील नेत्यांच्यामध्ये कमिटमेंटची अडचण आहे का? या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, आमचं अडीच वर्षांचं सरकार होतं तेव्हा भाजपचे लोकही येवून सांगतं होते तुमच्याकडे काही आहे का? सत्तेच्या सावलीत राहण्यासाठी धडपडणारे, चांगली झोप लागण्यासाठी धडपडणारे १०-२० टक्के लोकं असतात. पण सगळेच तसे असतात हा गैरसमज करुन घेणे चुकीचे आहे.

मुंबई TAK बैठक : भाजप की शिंदे… BMC मध्ये महापौर कुणाचा? अतुल भातखळकरांचं उत्तर

२०१९ ला संख्या मर्यादित होते. त्यामुळे गणित एकत्र करण्यासाठी सगळेच बेरीज करत होते. सामान्य माणसांचंही मत होतं की, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुमत होतं आहे सरकार बनवावं. त्यानुसार ते सरकार बनलं. त्याच्या दुसऱ्या बाजूला पडद्याआड कोण बोललं, कोणाशी चर्चा झाली याबाबत मला कल्पना नाही. पवार साहेब किंवा भाजपची चर्चा झाली असावी असं मला वाटतं नाही. त्यानंतर पवार साहेबांनी शेवटपर्यंत महाविकास आघाडीसोबतची कमिटमेंट पूर्ण केली, अजूनही आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत.

ADVERTISEMENT

सरकार स्थापनेवेळी एखादा पक्ष आपल्यासोबत असावा असा प्रयत्न असतो तसा प्रयत्न भाजपचा होता. त्यातून त्यांनी पंतप्रधान मोदी यांना आपलं जमू शकत नाही असं सांगितलं असाव, पण भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी एकत्र येणं महत्वाचं आहे, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आणि त्यावर आम्ही शिवसेनेसोबत महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो. शेवटी फायनल निर्णय काय होतो याला राजकारणात महत्व असतं.

ADVERTISEMENT

मुंबई Tak बैठक: अजित पवार नॉट रिचेबल असताना कुठे होते?, फडणवीसांनी खरं काय ते सांगूनच टाकलं!

२०१९ च्या पहाटेच्या शपथविधीबाबत कसं कळलं?

२०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीबद्दल कसं कळलं? याबाबत जयंत पाटील म्हणाले, मला उद्धव ठाकरे यांचा फोन आला. ते मला म्हणाले, झाला का शपथविधी? म्हटलं कोणाचा? म्हटलं मी झोपलो आहे घरात. त्यानंतर मी टीव्ही बघितला आणि त्यावर मला कळलं. अशा काही गोष्टी घडत आहेत किंवा घडणार आहेत याबाबत मला सुतरामही कल्पना नव्हती, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT