Bihar Political Crisis : राजकीय भूकंप! नितीश कुमारांनी दिला राजीनामा, कारणही सांगितले
नितीश कुमार रविवारी (28 जानेवारी) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी माहिती समोर आली होती. त्याप्रमाणे सकाळी 11 वाजेच्या सुमारास नितीश कुमार हे बिहारचे राज्यपाल जाखड यांच्या भेटीला गेले. राजभवनात पोहोचल्यावर त्यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला.
ADVERTISEMENT
Nitish Kumar Resigns News, Bihar Crisis LIVE Updates in Marathi : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शक्यता खऱ्या ठरल्या. नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. भाजप आमदारांच्या समर्थानाचं पत्र घेऊन नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
ADVERTISEMENT
नितीश कुमार रविवारी (28 जानेवारी) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी माहिती समोर आली होती. त्याप्रमाणे सकाळी 11 वाजेच्या सुमारास नितीश कुमार हे बिहारचे राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांच्या भेटीला गेले. राजभवनात पोहोचल्यावर त्यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला.
हेही वाचा >> अमित शाहांची भेट अन् 50 दिवसांत असं बदललं बिहारचं राजकारण, Inside Story
राजीनामा का दिला? नितीश कुमार म्हणाले…
राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितीश कुमार म्हणाले की, “मी काम करत होतो, पण मला काम करू दिले जात नव्हते. त्यामुळे लोक दु:खी होत होते. आज मी राजीनामा सोपवला आहे. आमच्या लोकांचे, पक्षाचे मत ऐकून घेतले आणि म्हणून आज मी राजीनामा देऊन तेथील सरकार बर्खास्त केली. ज्या पद्धतीने ते लोक दावा करत होते ते आमच्या लोकांना वाईट वाटत होते. आज इतर पक्ष जे आधी एकत्र होते, ते ठरवतील. पुढे काय होते ते पाहूया.”
हे वाचलं का?
#WATCH पटना: JDU अध्यक्ष नीतीश कुमार ने कहा, “आज मैंने मुख्यमंत्री पद से इस्तीफा दे दिया है और मैंने राज्यपाल से राज्य में सरकार को समाप्त करने के लिए भी कहा है…” pic.twitter.com/ta3r6FUxqp
— ANI_HindiNews (@AHindinews) January 28, 2024
बिहार राजभवनाने ट्विटरवर पोस्ट करत म्हटले की, ‘राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा स्वीकारला आणि पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितले आहे.’
ADVERTISEMENT
माननीय राज्यपाल श्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर @rajendraarlekar ने माननीय मुख्यमंत्री श्री नीतीश कुमार का त्यागपत्र स्वीकार किया तथा वैकल्पिक व्यवस्था होने तक उन्हें कार्यवाहक मुख्यमंत्री के रूप में कार्य करने को कहा। pic.twitter.com/t5mo95pYKp
— Raj Bhavan, Bihar (@GovernorBihar) January 28, 2024
ADVERTISEMENT
भाजपच्या पाठिंबा, नितीश कुमार पुन्हा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता एनडीएच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू झाली आहे. जेडीयू विधीमंडळ पक्षाच्या बैठकीतच नितीश कुमार यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शपथविधीसाठी राजभवनात जय्यत तयारी सुरू झाली आहे. नितीश कुमार आज नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
इंडिया आघाडीला झटका
बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, यासोबतच राज्यातील 17 महिन्यांचे राजद-जदयू महाआघाडी सरकार संपुष्टात आले आहे. राजीनामा देण्यापूर्वी नितीश कुमार जेडीयू आमदारांच्या बैठकीत म्हणाले की, आता एकत्र राहणे कठीण आहे आणि राजीनामा देण्याची वेळ आली आहे. बैठकीनंतर ते राजीनामा देण्यासाठी राजभवनात पोहोचले. नितीश कुमार यांचे हे पाऊल इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण नितीश कुमार हेच त्याचे ते स्वतः शिल्पकार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT