Irshalwadiला पोहचलेल्या आदित्य ठाकरेंनी ‘असा’ दाखवला समजूतदारणा, म्हणाले…
इर्शाळवाडी येथे डोंगर कडा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेविषयी आपण आज कोणतेही राजकीय प्रश्न उपस्थित करणार नाही. तर येथे अडकलेल्या लोकांना लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
ADVERTISEMENT
latest marathi news maharashtra: रायगड: रायगड (Raigad) जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील दुर्घटनास्थळी (irshalwadi landslide) शिवसेना (UBT) नेते, आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहचून इथल्या दुर्घटनेबद्दल नेमकी माहिती घेतली. मात्र, यावेळी मी सरकारला कोणतेही प्रश्न विचारणार नाही, तसं केलं तर मी राजकारण करतोय असं चित्र निर्माण होईल. जे आताच्या घडीला चुकीचं ठरेल. सध्या मदत कार्य महत्त्वाचं आहे. या सगळ्याबाबत विधिमंडळात बोलू.. अशी संयमी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. प्रसारमाध्यमांकडे मांडलीय.. यावेळी आदित्य ठाकरेंनी दरड कोसळलेल्या दुर्घटनास्थळी जाऊन दरडग्रस्तांच्या नातेवाईकांना धीर दिला. (not raise any political questions about terrible tragedy irshalwadi landslide will try to get help to people stuck said aaditya thackeray breaking news in marathi online)
ADVERTISEMENT
इर्शाळवाडीला पोहचलेल्या आदित्य ठाकरेंनी नेमकी काय दिली प्रतिक्रिया?
‘ही घटना एवढी भीषण आहे की, भौगोलिक परिस्थितीमुळे, पावसामुळे अजूनही बचाव कार्यात अडथळा येत आहे. अशावेळी सरकारी यंत्रणा, स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहेतच. त्यांना यश येऊन इथले गावकरी सुखरूप ह्या संकटातून बाहेर येवोत, ही ईश्वर चरणी प्रार्थना.’
‘मी दोन-तीन वर्षांपासून सातत्याने बोलत आलोय की, वातावरणीय बदल.. हे आपल्या डोळ्यासमोर सत्य दिसत आहे. कधी अवकाळी, गारपीट तर कधी जास्तीचा पाऊस.. असा पाऊस पडणं देखील विचित्र घटना आहे. ज्याला आपण तयार राहणं, काय उपाययोजन करू शकतो.. सगळ्या पक्षांनी यावर एकत्र येऊन विचार करणं गरजेचं आहे.’
‘राजकारणी लोकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जाणं टाळलं पाहिजे. महत्त्वाची गोष्ट हीच असणार आहे की, आपली जी देवाकडे प्रार्थना आहे. अडकलेली लोकं सुखरुप असावीत.. याच्यासाठी कुठेही अडथळा निर्माण होऊ नये. यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे.’
‘दरड कोसळणं, वातावरण बदल याबाबत शेवटी सरकारचं एक अनुमान असतं. पण जे वातावरण बदल आहेत ते अपेक्षेनुसार नाहीत. म्हणून इथे आताचा स्थितीला मदतकार्य गरजेचं आहे. कसं घडलं, का घडलं हे सगळे प्रश्न उपस्थित होतील. पण ते योग्य वेळेला उपस्थित करू आम्ही विधानभवनात आणि वेगवेगळ्या ठिकाणी.. पण आज जे अडकले आहेत ते सुखरुप खाली यावेत ही आपली प्राथमिकता आहे.’
‘प्रश्न आम्ही नंतरही विचारू.. आज काही राजकारण करण्याचा दिवस नाही. मला वाटतं की, जे लोकं अडकले आहेत.. आणि जे मदतकार्यात व्यस्त आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूयात.’
‘मी आजही काहीही सवाल उपस्थित करणार नाही. कारण मी आज काही सवाल विचारले तर ते राजकारण केलं असं होईल. यावर प्रश्न नक्की उपस्थित होतील. पण ते प्रश्न आपण विधानसभेत विचारु. पण आज जे अडचणीत आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे.’ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी यावेळी दिली आहे.
हे ही वाचा >> Irshalwadi Landslide : “आम्ही हाताने माती उकरून लेकरं बाहेर काढली”
इर्शाळवाडीची नेमकी दुर्घटना कशी घडली?
गुरुवारची (20 जुलै) सकाळ महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी घेऊनच उगवली. रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावाचा दरडीने घास घेतला. इर्शाळगडाच्या डोंगराचा एक भाग इर्शाळवाडी गावावर कोसळला. 48 घरांची ही वाडी असून, मध्यरात्री ही घटना घडली असून, 100 पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून, एनडीआरएफकडून युद्ध पातळीवर बचाव व मदत मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही घटनास्थळी दाखल झाले असून, इर्शाळवाडीच्या घटनेने माळीण दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या.
हे ही वाचा >> Irshalwadi Landslide : ‘हवाई मार्गे जेसीबी नेण्याचे प्रयत्न’, मृतांचा आकडा वाढला
रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इर्शाळवाडी गाव आहे. हे गाव कर्जत तालुक्यात येते. गुरूवारी पहाटे (20 जुलै) लोक गाढ झोपेत पावसामुळे असतानाच गावावर दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले. जवानांकडून तातडीने बचाव व मदत कार्य सुरू केले.
हे वाचलं का?
इर्शाळवाडी गावातील स्थितीची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “जी आपातकालीन यंत्रणा आहे, मग त्यात एसडीआरएफ आहे. एनडीआरएफ आहे. महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या आपतकालीन यंत्रणा अलर्ट आहेत. जिथे जिथे गरज असेल, तेथील लोकांनी सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. मदतीच्या सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांची गैरसोय, त्रास, जीवितहानी होणार नाही, याच्या सूचना दिल्या आहेत.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT