Manoj Jarange Patil: ‘…तर त्या दिवशी मी आत्महत्या करेन’, उपोषण सोडताच जरांगे-पाटलांचं तुफान भाषण
Manoj Jarange Patil Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मागील 17 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी त्यांनी जोरदार भाषण केलं.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Patil Speech: अंतरवाली-सराटी: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आग्रही असलेल्या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी तब्बल 17 दिवसांच्या आंदोलनानंतर आपलं आमरण उपोषण सोडलं. मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सोडावं यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज (14 सप्टेंबर) अंतरवाली सराटीत आले होते. जिथे काही वेळ चर्चा केल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हातून फळाचा ज्यूस घेत जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सोडलं. (on that day i will commit suicide manoj jarange Patil stormy speech infront of cm eknath shinde after breaking the fast)
ADVERTISEMENT
दरम्यान, उपोषण सोडल्यानंतर आरक्षणाबाबत आपली काय भूमिका असेल याविषयी जरांगे-पाटलांनी जोरदार भाषण केलं. यावेळी जरांगे पाटील यांनी रावसाहेब दानवेंनी त्यांना दिलेल्या चिठ्ठीविषयी देखील भाष्य केलं. आपण पारदर्शक आहोत.. त्यामुळे आपल्या कोणी एक पैशाचाही संशय घेईल त्या दिवशी आपण आत्महत्या करू असं विधानही त्यांनी यावेळी केलं.
हे ही वाचा >> Maratha Reservation : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं! CM शिंदे आल्यानंतर काय घडलं?
उपोषण सोडताच जरांगे-पाटलांचं जोरदार भाषण
29 तारखेला आंदोलन सुरू झालं तेव्हापासून मी सांगत होतो की, मराठा समाजाला न्याय देऊ शकतील तर फक्त एकनाथ शिंदे साहेबच.. मला माझा समाज प्रिय आहे.. समाजाच्या हिताचा निर्णय घेईल त्याशिवाय मागे हटणार नाही. हे तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगितलं आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सध्या इतकी आशा आहे की, प्रत्येक जण म्हणतो.. आणि जास्त करून मीच म्हणतो की, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता या राज्यात कोणामध्ये असेल तर ती एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे.
शिंदे साहेब आपल्याला न्याय दिल्याशिवाय मागे हटणार नाहीत. त्यांनी आपल्यासमोर येऊन सिद्ध करून दाखवलं आहे. मी भारावून न जाता मराठा समाजाच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहून शिंदे साहेबांच्या मागेच लागणार आहे आणि आरक्षणच घेणार आहे.. तुम्ही टेन्शन घेऊ नका..
मी तुम्हाला शब्द दिलाय त्याप्रमाणे मी वागणार आणि तुमच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की, एक महिन्याचा वेळ द्या.. सरकारच्या वतीने तसा प्रस्ताव होता.
मी सगळ्या समाजाला विश्वासात घेतलं. 50 हजारापेक्षाही जास्त लोकं बैठकीला होते. सगळ्यांना विचारलं होतं. सरकारला एक महिन्याचा वेळ द्यायचा होता देऊ का?
दुसरं.. म्हणजे सरकार म्हणतंय आमरण उपोषण मागे घ्या.. घेऊ का? तुम्ही ज्यावेळेस म्हटलं की, सरकारला वेळ द्या आणि उपोषण मागे घ्या.. त्याच वेळेस मी हा निर्णय घेतला आहे. म्हणजे मी तुमच्याशी प्रामाणिक आहे. इथून पुढच्या काळातही तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही.
तुम्ही ती चिठ्ठी काढली दादा.. आणि या लोकांनी मला हैराण करून टाकलं.. काय आहे त्या चिठ्ठीत.. काय आहे त्या चिठ्ठीत म्हणून..
सांगून टाकतो लगेच काय होतं त्यात.. मी तसले धंदेच करत नाही.. खानदानाच्या घरात जन्माला आलोय मी. ओरिजनल खानदानी मराठा आहे.. कोणाच्या सांगण्यावरून आंदोलन करत नाही. त्या चिठ्ठीत स्पष्टपणे आमच्या मागणीविषयी चर्चा होती. ते होतं..
मी पारदर्शक आहे माझ्या मराठा समाजासमोर.. माझं वाटोळं झालं, राखरांगोळी झाली तरी चालेल पण माझ्या मराठा समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही. मराठा समाजाच्या पोरांशी घात करू नका. कारण आरक्षणाचा घास आलाय आमच्या तोंडाशी. पाच पिढ्या नुकसान झालंय.. तुमच्या राजकारणापायी माझ्या पोरांचा घात पाडू नका.. एवढं लक्षात ठेवा..
आताही सांगतो.. सरकारला दिलेल्या वेळेबाबत आम्ही ठाम आहोत. सरकारला मोठ्या मनाने वेळ दिला आहे. आता समाजाच्या वतीने आणखी दहा दिवस वाढवून देतोय. पण आम्हाला आरक्षण द्या आम्हाला बाकी काही अपेक्षा नाही.
माझा जीव गेला तरी चालेल.. पण तुमच्या पोरांच्या पदरात आरक्षणच टाकेल.. तेव्हाच थांबेल.. उभ्या आयुष्याची राखरांगोळी केलीय.. माझ्या रानाचा बांध कुठे हे मला माहीत नाही. इतकं समाजासाठी रात्रं-दिवस मी करतोय.
योगायोगाने माझा बाप इथं आज आलाय.. माझं मोठेपण सांगत नाही. माझा बाप कष्ट करतो आणि आम्हाला खाऊ घालतो आणि हा पठ्ठ्या त्यांचं कष्ट केलेल्याचं खाऊन समाजाचं काम करतो. एक जण मला म्हणाला की, तुला रुपया इकडे-तिकडे फिरायला दिलेला आहे तर त्या दिवशी मी आत्महत्या करेन.. हे असले चिठ्ठ्या-फिट्ट्याचं कारणं आम्हाला सांगायचं नाही. ते मला सहन होणार नाही.
तुमच्या प्रश्नाबाबत मी एक इंचही मागे हटलेलो नाही.. पण शिंदे साहेब येईन म्हटले होते आणि मार्गदर्शन करेल म्हटले होते. ते आज इथे आले.
महाराष्ट्रातील मराठा समाजाला सांगतो की, तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही. शिंदे साहेबांना देखील हटू देणार नाही. त्यांच्या मागेच राहणार आहे मी.. मलाही काही काम नाही.. मी एकदा मागे लागलो की, कसा मागे लागतो..
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT