Opposition unity : UPA होणार नामशेष! भाजपविरोधात काय आहे रणनीती?
18 जुलै रोजी दुपारी 4 वाजता बैठकीनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. 18 तारखेला मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणाने सभेला सुरुवात होणार आहे.
ADVERTISEMENT
Lok Sabha Election 2024 : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 18 जुलै रोजी बंगळुरूमध्ये विरोधकांची ‘महाबैठक’ आयोजित करण्यात आलीये. या बैठकीत काँग्रेससह 24 पक्ष सहभागी होत आहेत. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस (TMC) आणि आम आदमी पार्टी (AAP) या भाजपविरोधी पक्षांच्या नव्या आघाडीला यापुढे संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) म्हटले जाणार नाही. सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की, मंगळवारी बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या बैठकीत नवीन नावावर निर्णय होण्याची शक्यता आहे. (Ahead of next year’s Lok Sabha elections, a ‘Maha Baithak’ of the opposition is being held in Bengaluru today.)
ADVERTISEMENT
तेव्हा सोनिया गांधी होत्या अध्यक्षा
यूपीए 2004 ते 2014 पर्यंत दोन टर्म केंद्रात सत्तेवर होती आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षा आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित भाजप विरोधी गटाचा एक समान किमान कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे. त्याचबरोबर विरोधकांच्या बैठकीत राज्यनिहाय जागावाटपावर चर्चा केली जाणार आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या आघाडीकडून समान किमान कार्यक्रम आणि चर्चेचे मुद्दे तयार करण्यासाठी एक उपसमिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे वाचलं का?
नव्या नावाबद्दल जयराम रमेश काय बोलले?
बैठकीबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, ’26 पक्ष आहेत. आम्ही विविध मुद्द्यांवर एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहोत. भविष्यातील सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. आम्ही ते सर्व सोडवू.’
यूपीएच्या ऐवजी नवीन नावाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर जयराम रमेश म्हणाले, ‘काळजी करू नका. आम्ही सर्व निर्णय घेऊ. आम्ही काय चर्चा करणार, हे मी आत्ताच सांगू शकत नाही कारण हा फक्त काँग्रेसचा विषय नाही. आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेऊ.’
ADVERTISEMENT
वाचा >> Lok Sabha 2024 : भाजपचं ‘खेला होबे’! शिंदे, पवारांनंतर आणखी तीन नेते ‘एनडीए’त
मोदींच्या विरोधात नेता कोण असेल यावर उत्तर देताना रमेश म्हणाले, ‘सोनिया गांधी संसदेच्या सर्व बैठकांमध्ये होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे विरोधकांच्या सभांना बळ मिळणार आहे.’ जेडीएसच्या निमंत्रणावर जयराम रमेश म्हणाले की, निमंत्रणाची गरज नाही. भाजपच्या विरोधात लढण्याची हिंमत असलेले कुणीही आमच्यासोबत येऊ शकतात.
ADVERTISEMENT
काय होणार विरोधकांच्या बैठकीत?
1) आज होणाऱ्या बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यासाठी आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने आघाडीसाठी चर्चेचा मसुदा तयार करण्यासाठी उपसमिती स्थापन करणे.
2) पक्षांचा संयुक्त कार्यक्रम तयार करण्यासाठी उपसमितीची स्थापना, ज्यामध्ये रॅली, परिषदा आणि आंदोलने यांचा समावेश असणार आहे.
3) राज्यनिहाय जागावाटपाच्या प्रक्रियेवर चर्चा करणे.
4) EVM च्या मुद्द्यावर चर्चा करणे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला सुधारणा सुचवणे.
5) आघाडीसाठी नाव सुचवणे.
6) प्रस्तावित आघाडीसाठी संयुक्त सचिवालय स्थापन करणे.
वाचा >> Maharashtra assembly session : राष्ट्रवादीचे आमदार विधानसभेत कुठे बसले?
18 जुलै रोजी दुपारी 4 वाजता बैठकीनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. 18 तारखेला मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणाने सभेला सुरुवात होणार आहे.
सोनिया गांधींची डिनर डिप्लोमसी
एकीकडे राहुल गांधींनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याबरोबरीने विरोधकांची आघाडी कायम ठेवली आहे, तर दुसरीकडे सोनिया गांधीही सक्रिय झाल्या आहेत. सोनिया गांधीही 18 जुलैच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीपूर्वी 17 जुलैच्या रात्री सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना भोजनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या डिनरची आयडियाही सोनिया गांधींची असल्याचे सांगण्यात आले.
पाटणा येथील बैठकीला हे नेते होते उपस्थित
पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीला 15 पक्षांचे 27 नेते हजर होते. नितीश कुमार (जेडीयू), ममता बॅनर्जी (एआयटीसी), एमके स्टॅलिन (डीएमके), मल्लिकार्जुन खरगे (काँग्रेस), राहुल गांधी (काँग्रेस), अरविंद केजरीवाल (आप), हेमंत सोरेन (जेएमएम), उद्धव ठाकरे (शिवसेना युबीटी), शरद पवार (NCP), लालू प्रसाद यादव (RJD), भगवंत मान (AAP), अखिलेश यादव (SP), KC वेणुगोपाल (काँग्रेस), सुप्रिया सुळे (NCP), मनोज झा (RJD), फिरहाद हकीम (AITC), प्रफुल्ल पटेल (NCP), राघव चढ्ढा (आप), संजय सिंह (आप), संजय राऊत (SS-UBT), लालन सिंह (JDU), संजय झा (JDU), सीताराम येचुरी (CPIM), ओमर अब्दुल्ला (एनसी), टीआर बालू (डीएमके), मेहबूबा मुफ्ती (पीडीपी), दीपंकर भट्टाचार्य (सीपीआयएमएल), तेजस्वी यादव (आरजेडी), अभिषेक बॅनर्जी (एआयटीसी), डेरेक ओब्रायन (एआयटीसी), आदित्य ठाकरे (SS-UBT) आणि डी राजा (CPI) अशी या नेत्यांची नावे आहेत.
राजकीय समीकरण किती बदलली?
पाटणा येथे झालेल्या बैठकीनंतर तब्बल 25 दिवसांनी दुसरी सभा होत आहे. पण मधल्या काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कहाणी पूर्णपणे बदलली आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार बंडखोरी करून महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार असल्याचा त्यांचा दावा आहे. एवढेच नाही तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा केला आहे. राष्ट्रवादीचा हा लढा निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT