Ajit Pawar : ‘महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा’; छगन भुजबळांच्या भाषणावर अजितदादा बोलले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajit Pawar Press Conference Chhagan Bhujbal Sharad pawar
Ajit Pawar Press Conference Chhagan Bhujbal Sharad pawar
social share
google news

Ajit Pawar Press : राज्यात रविवारी झालेल्या बड्या नेत्यांच्या सभेनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पुण्याच्या गणेशोत्सव काळातील रेल्वेसह पोलीस प्रशासनाचे नियोजनाविषयी माहिती दिली आहे. पुण्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असल्याने आणि देशासह परदेशातील नागरिकही हा गणेशोत्सव पाहण्यासाठी येत असल्याने मेट्रोचे रात्री बारा पर्यंत सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

सुसंस्कृत राजकारणाची परंपरा

अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्यातील शेतीच्या प्रश्नासह राजकीय घडामोडींवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. रविवारी बीड आणि हिंगोलीमध्ये झालेल्या सभेमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यातच बीडमध्ये झालेल्या सभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. तर त्याच वेळी हिंगोलीतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर बोलतान अजित पवार यांनी आपली भूमिका सांगत नेत्यांना टीका टिपणी करायची असली तर ती सुसंस्कृतपणे केली पाहिजे असं सांगत आपल्या गटातील नेत्यांसह त्यांनी राजकारण्यांचे कान टोचले.

बोलण्यावर ताबा हवा

मंत्री छगन भुजबळ यांनी कालच्या सभेतून शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावरुन अजित पवारांना प्रश्न विचारताच त्यांनी सांगितले की, आपल्या राज्याला यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसा आहे. त्यामुळे आरोप करतानाही सुसंस्कृतपणे करणे गरजेचे आहे. कुणाच्या भावना दुखावत असतील तर त्यावर आपणच आपल्या बोलण्यावर ताबा ठेवला पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवार यांचे नाव घेतले नाही

अजित पवार यांना शरद पवार यांचे तुम्ही तुमच्या भाषणात नाव घेतला नाही. त्याच वेळी त्यांचे नेते छगन भुजबळ यांनीही शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यावर प्रश्न विचारताच त्यांनी सांगितले की, सर्वांनी बोलताना आपापली काळजी घेतली पाहिजे कारण आपल्या राज्याचे राजकारणाला सुसंस्कृतपणाचा वारसा असल्याचे सांगत त्यांनी शरद पवार यांच्या प्रश्नावर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका स्पष्ट केली नाही.

भुजबळांचे भाषण ऐकलं नाही

अजित पवार यांनी छगन भुजबळांनी टीका केली त्यावर बोलताना मात्र ते नेमके काय बोलले हे साऊंड सिस्टीममुळे मला समजू शकले नाही असही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच कुणालाही मत व्यक्त करण्याचा अधिकार असला तरी व्यक्त केल्या जाणाऱ्या मतामुळे कुणीही दुखावला जाऊ नये असंही त्यांनी यावेळी सांगितले.

ADVERTISEMENT

राजकीय भूमिका स्पष्ट

अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या आरोप प्रत्यारोपांबद्दल बोलताना आपलीही राजकीय भूमिका स्पष्ट केली. शिंदे-फडणवीस यांच्याबरोबर काम करताना आम्ही सगळे जण खेळीमेळीच्या वातावरणात काम करतो आहे. त्याचबरोबर मी फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचाराने पुढं जाणारा माणूस असल्याचे सांगत त्यांनी आपली राजकीय भूमिकाही स्पष्ट केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT