‘मला विरोधी पक्ष नेतेपद नको, फक्त…’, शरद पवारांसमोरच अजितदादांनी टाकला नवा बॉम्ब
मला विरोधी पक्ष नेते पद नको.. त्याऐवजी पक्षात एखादी जबाबदारी द्या अशी मागणी अजित पवार यांनी जाहीरपणे केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ADVERTISEMENT
Maharashtra Politics Latest News: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा पक्ष सध्या अनेक स्थित्यंतरामधून जात आहे. 2 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा पेश केला होता. जो यथावकाश मागे घेण्यात आला. राजीनामा मागे घेतल्यानंतर काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी पक्षात भाकरी फिरवत सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. पण असं असताना या सगळ्यात पक्षात किंवा संघटनेत अजित पवार (Ajit Pawar) यांना अजिबात स्थान दिलं नाही. याच मुद्द्यावरुन अजित पवार यांनी आज (21 जून) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या समोरच एक नवा बॉम्ब टाकला. (post of leader of the opposition ajit pawar eyebrows raised statement sharad pawar anniversary of nationalist congress party)
ADVERTISEMENT
सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यापासून अजित पवार हे नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, आज हीच नाराजी पुन्हा एकदा जाहीरपणे समोर आली आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितलं की, ‘राज्याच्या विरोधी पक्षनेते पदामध्ये मला अजिबात रस नाही. त्याऐवजी पक्षात मला कोणतंही पद द्या.’
हे ही वाचा >> सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य उपमुख्यमंत्री, ठाकरे-पवार डीलमुळे शिवसेना फुटली ?
‘मला विरोधी पक्ष नेते पदातून आता मुक्त करा.. आणि संघटनेची जबाबदारी द्या.. आणि मग कशा पद्धतीने पक्ष चालतो… अर्थात हा अधिकार नेते मंडळींचा आहे. पण माझी इच्छा आहे.. बाकीचे वेगवेगळे इच्छा प्रदर्शित करतात. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडली आहे. त्यामुळे थोडं संघटनेत कुठलंही पद द्या. काय कसलंही पद द्या.. तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या. त्या पदाला न्यायच दाखवून देईल. एवढा शब्द देतो मी..’ असं अजित पवार यावेळी म्हणाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पवारांसमोरच अजितदादांनी टाकला नवा बॉम्ब
‘नव्या चेहऱ्यांना लोकसभा-विधानसभेला संधी देण्याचं प्रयत्न करतोय. साहेबांचं त्याकडे लक्ष आहे. मला एवढंच सांगायचं आहे. की, मला गेल्या 30-32 वर्षात.. म्हणजे 1991 साली मी खासदार झालो. त्याआधी बँकेचा चेअरमन होतो. रमेश आप्पांनी सांगितलं.. तालुक्यात काय करता.. जिल्ह्यात या. बँकेत आल्यावर तुम्हाला जिल्हा माहीत होईल. म्हटलं बँकेत कसं येणार.. म्हटलं आमचं तिथे जमतच नाही तर कसं येणार बँकेत निवडून..’
‘पण त्यांना काय माहीत की बँकेत आल्यावर बँक कायमचीच याच्या हातात राहील. ते अजून पण आमच्याच हातात आहे. तशा पद्धतीने.. अर्थात चांगली चालवतोय. या सगळ्याबाबत मला एवढंच सांगायचं आहे की, आता एवढी वर्ष सगळीकडे काम केलं आहे.’
ADVERTISEMENT
‘मला स्टेजवरच्या मान्यवरांना आणि आपल्यालाही सांगायचं आहे.. मला विरोधी पक्षनेते पदामध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. परंतु आमदारांनी आग्रह केला.. त्यांनी ते सह्या केल्या आणि त्यामुळे त्यांच्या खातर आणि नेतेमंडळींनी पण सांगितलं की, अजित तू हो..’
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Ravindra Chavan : “एकनाथ शिंदेंच्या बंडाचं भाजपने दिल्लीत केले प्लानिंग, फडणवीस होते…”
‘1 वर्ष मी विरोधी पक्षनेते पद सांभाळलं आहे. ते सांभाळत असताना काहीचं म्हणणं आहे की, तू कडक वागत नाही.. आता म्हटलं की… आता त्यांची गचांडी धरू की काय करू? म्हणजे काय आता कळत नाही..’
‘पण म्हटलं आता बस झालं.. मला त्यातून आता मुक्त करा.. आणि संघटनेची जबाबदारी द्या.. आणि मग कशा पद्धतीने पक्ष चालतो… अर्थात हा अधिकार नेते मंडळींचा आहे. पण माझी इच्छा आहे.. बाकीचे वेगवेगळे इच्छा प्रदर्शित करतात. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडली आहे. त्यामुळे थोडं संघटनेत कुठलंही पद द्या. काय कसलंही पद द्या.. तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या. त्या पदाला न्यायच दाखवून देईल. एवढा शब्द देतो मी..’ असं अगदी ठाशीव पद्धतीने अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं.
ADVERTISEMENT