Praful Patel: NCP चा निकाल ‘या’ दिवशी खरंच लागणार?, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
NCP and Election Commission: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी दावा केला की 30 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याचा निकाल लागेल. मात्र, खरंच निवडणूक आयोग 30 सप्टेंबरपर्यंत निकाल देऊ शकतं का हे आपण जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
NCP Party and Election Commission: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) निवडणूक आयोगाकडील फैसला हा 30 सप्टेंबरच्या आसपास येण्याची शक्यता आहे, आणि तो 100 टक्के अजित पवारांच्या (Ajit Pawar) बाजूने येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातील राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांनी केला आहे. पण 30 सप्टेंबरला अवघे 32 एक दिवस राहिले आहेत, अशात निवडणूक आयोग राष्ट्रवादी कुणाची याचा निर्णय घेऊ शकतो का? निवडणूक आयोगाला पक्षांच्या वादांमध्ये निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा असते का? याआधी काय घडलंय हे आपण सविस्तपणे जाणून घेऊयात. (praful patel claims ncp party decision will be taken on september 30 latest political news maharashtra)
ADVERTISEMENT
1999 ला स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर याआधीही ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला आहे, पण आता मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवारांनीच राष्ट्रवादीवर दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच पुढच्या निवडणुका लढवू हे आधीच जाहीर केलं आणि भाजपसोबत सत्तेत जाण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून शरद पवारांनाही हटवलं आहे.
निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार?
30 जूनला अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीमध्येच शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवलं, आणि कार्यकारिणीच्या संमतीने अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं. विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून जयंत पाटलांना हटवलं आणि अजित पवारांना गटनेता केलं. शिवसेना बंडावेळी ज्या चुका झाल्या त्या टाळण्यासाठी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी हे सगळं करवून घेतलं.
हे वाचलं का?
आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षही अजित पवार आणि गटनेताही अजित पवार, अशात राष्ट्रवादी पक्षाच्या संमतीने आणि गटनेत्याच्या पत्रामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपसोबत जायला पाठिंबा असल्याचं विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांना दाखवण्यात आलं.
अर्थात ही सगळी खेळी आहे, आणि कोण गटनेता, कोण राष्ट्रीय अध्यक्ष हे सगळे अजित पवारांनी निवडणूक आयोगासमोर केलेले दावे आहेत. याला मान्यता कितपत मिळेल हे निवडणूक आयोगाच्या निकालात समजेल. पण प्रश्न हा की प्रफुल पटेल यांच्या दाव्यानुसार 30 सप्टेंबरआधी निकाल लागेल का?
ADVERTISEMENT
तर मुळात पक्षामध्ये फूट पडल्यास, दोन गट तयार झाल्यास खरा पक्ष कुणाचा याचा निर्णय निवडणूक आयोगालाच घ्यायचा झाला तरी तो किती वेळात घ्यावा यासाठी कुठलं बंधन किंवा कालमर्यादा नाही.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Ajit Pawar Press : ‘महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा’; भुजबळांच्या भाषणावर अजितदादा बोलले
शिवसेनेच्या बाबतीत निर्णय घ्यायला निवडणूक आयोगाला 7 महिने लागले तर तेच लोक जनशक्ती पक्षामध्ये फूट पडून 2 वर्षे झाली तरी अजून निकाल देण्यात आलेला नाही.
पण शिवसेना असो किंवा LJP दोन्ही पक्षांमध्ये पडलेल्या गटांना नवं पक्षाचं नाव आणि चिन्हं देण्यात आलेलं. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने उमेदवार उतरवल्यामुळे तर LJP मध्ये फूट पडली तेव्हा तर बिहार विधानसभा निवडणुका असल्यामुळे निवडणूक आयोगाला पक्षाचं मूळ नाव आणि चिन्हं गोठवून दोन्ही गटांना नवी नावं आणि चिन्हं द्यावं लागलं. पण राष्ट्रवादीच्या बाबतीत तसं नाहीये.
ना कुठली निवडणूक किंवा पोटनिवडणूक लागली आहे. आणि लागली तरी पुणे आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपच लढत आले आहेत. त्यामुळे तसा राष्ट्रवादी आणि निवडणुकांचा तूर्तास संबंध नाहीये.
सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावलेल्या आहेत. शरद पवार गटाने मागितलेली मुदतवाढ संपत आली असून 13 सप्टेंबरपर्यंत त्यांना उत्तर द्यायचं आहे. अजित पवार गटाने आधीच उत्तर दिलं आहे.
त्यानंतर निवडणूक आयोगात सुनावण्या घेतल्या जातील, सुनावण्यांनंतर निर्णय यायला सहसा फार वेळ लागत नाही. 20 जानेवारी 2023 ला निवडणूक आयोगात शिवसेनेतल्या दोन्ही गटांची सुनावणी पूर्ण झालेली आणि निकाल 17 फेब्रुवारी 2023 ला लागला. म्हणजे महिन्याभराच्या आत. त्यामुळे 13 सप्टेंबरनंतर निवडणूक आयोगाने सुनावण्यांना सुरूवात केली तर 30 सप्टेंबरलाच निकाल लागेल असं 100 टक्के सांगता येणार नाही. पण सुनावण्या भराभर घेऊन ऑक्टोबरपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> Nitesh Rane on Thackeray Family : ‘स्टुडिओ विकण्यासाठी ठाकरेंच्या नितीन देसाईंना धमक्या’; नितेश राणेंचे गंभीर आरोप
महत्वाचं म्हणजे 2004 ला जेव्हा निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादीचंच प्रकरण गेलेलं, तेव्हा तर निवडणूक आयोगाने अवघ्या 3 महिन्यांच्या आत निकाल लावलेला. 27 जानेवारी 2003 ला पी.ए.संगमा यांनी निवडणूक आयोगात धाव घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला होता, आणि 8 मार्च 2004 ला निवडणूक आयोगाने निकाल लावलाही. तेव्हाही लोकसभा निवडणुकांचं मतदान 20 एप्रिलपासून सुरू होणार होतं, पण त्याच्या आत मार्चमध्येच निवडणूक आयोगाने निकाल लावला होता.
त्यामुळे शिवसेनेच्या निकालाला 7 महिने लागले, किंवा लोक जनशक्ती पक्षाबाबत अजून निर्णय झालाच नाही म्हणून राष्ट्रवादीच्या केसमध्येही वेळ लागेल असा निकष इथे लावता येणार नाही. आधीप्रमाणे आताही राष्ट्रवादीचा निकाल 2-3 महिन्यांत लागू शकतो. अर्थात पुढच्या गोष्टी या निवडणूक आयोग सुनावणी आणि निकालाला किती वेळ लावतो यावर अवलंबून असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT