Rahul Gandhi : राहुल गांधी यांची खासदारकी गेली, काँग्रेसला झटका; लोकसभा अध्यक्षांची मोठी कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Rahul Gandhi disqualified as mp
Rahul Gandhi disqualified as mp
social share
google news

Rahul Gandhi disqualified from membership of lok sabha : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांची खासदारकी राहणार की जाणार, याची चर्चा सुरू झाली होती. न्यायालयाच्या निकालानंतर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Rahul Gandhi disqualified from lok sabha membership)

ADVERTISEMENT

या कारवाईनंतर काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून टीका केली होती. त्यावरून त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा ठोठावली.

मोदी आडनाव बदनामी प्रकरण : राहुल गांधी काय म्हणाले होते?

राहुल गांधींना ज्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाली, ते 2019 मधील आहे. राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकात प्रचारसभेत मोदी आडनावावरून टीका केली होती.

कर्नाटकातील प्रचारसभेत राहुल गांधी म्हणाले होते की, नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं आडनाव एकच का आहे? सर्व चोरांचं नाव मोदी का असतं?

राहुल गांधींच्या या विधानावर आक्षेप घेत भाजपचे आमदार पूर्णेश भूपेंद्र पटेल यांनी अवमानना याचिका दाखल केली होती. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये प्रचारसभेत बोलताना सर्व चोरांचे आडनाव मोदी का? असं म्हणून मोदी समुदायाला बदनाम केले. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप पटेल यांनी याचिकेत केलेला होता. पूर्णेश भूपेंद्र पटेल हे आधीच्या सरकारमध्ये मंत्री होते.

ADVERTISEMENT

राहुल गांधींनी आरोप लावले होते फेटाळून

राहुल गांधी न्यायालयात हजर झाले होते, तेव्हा त्यांनी न्यायालयाला सांगितलं होतं की, “माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. प्रचारसभेत असं काही म्हणाल्याचं मला आठवत नाही. सूरत न्यायालयाने या प्रकरणात कर्नाटकातील तत्कालीन निवडणूक अधिकारी आणि भाषण रेकॉर्ड करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या व्हिडीओ रेकॉर्डरची साक्ष नोंदवली होती. त्यानंतर राहुल गांधींचा जबाब नोंदवला गेला होता.

ADVERTISEMENT

काँग्रेसची कठोर शब्दात टीका

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने ट्विटरवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. “राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. ते तुमच्यासाठी आणि देशासाठी सातत्याने रस्त्यापासून ते संसदेपर्यंत लढत आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करत आहेत. प्रत्येक षडयंत्रानंतरही ते ही लढाई लढत राहणार आहेत आणि या प्रकरणात न्यायालयीन कार्यवाही करू. लढाई सुरूच राहील”, असं काँग्रेसने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राहुल गांधींना शिक्षा, शरद पवारांची टीका

शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, “देशात मूलभूत अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीतील अभिव्यक्तीचा संकोच करण्याचा प्रयत्न केला जात असून, याबद्दल मला चिंता वाटतेय. विरोधी पक्ष, नेते आणि देशातील लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे, ही गंभीर बाब आहे. राहुल गांधी यांच्याबद्दलचा निकाल हाच मुद्दा अधोरेखित करत आहे. राष्ट्रवादीचे खासदार पीपी मोहम्मद फैजल यांचेही प्रकरण असेच आहे. राजकीय पटलावर सुरू झालेल्या नव्या पायंड्याबद्दल मला खेद वाटत आहे. आजच्या परिस्थितीत याची सर्वांनी गांभीर्याने दखल घ्यायला हवी,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT