‘जरांगे-पाटील.. तुम्हाला फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे..’, राज ठाकरेंना नेमकं म्हणायचं तरी काय?
सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या,आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
Raj Thackeray Reaction On Maratha Reservation, Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षण लढ्याला आज अखेर यश आले आहे. जरांगे पाटलांनी सरकार समोर ठेवलेल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत, त्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडले आहे. जरांगेंच्या या यशस्वी लढ्यानंतर राज्यभरात विजयाचा गुलाल उधळला जातोय, पेढे वाटले जातायत. या सर्व घडामोडीवर घटनातज्ज्ञ, वकील आणि राजकीय नेते प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशीच प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी देखील दिली आहे. राज ठाकरे यांची ही प्रतिक्रिया मराठ्यांचे डोळे उघडणारी आहे. नेमकं ते काय म्हणाले आहेत? ते जाणून घेऊयात. (raj thackeray mns reaction on maratha reservation manoj jarange patil mumbai rally cm eknath shine maharashtra politics)
ADVERTISEMENT
राज ठाकरे यानी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्वीट करून मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं त्यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलंय ते पाहूयात.
हे ही वाचा : Maratha Reservation : ‘मुख्यमंत्र्यांनी दिशाभूल केली’, उल्हास बापटांनी दाखवली ‘ही’ चूक
राज ठाकरेंचं ट्वीट जसेच्या तसे
मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !
हे वाचलं का?
श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही…
— Raj Thackeray (@RajThackeray) January 27, 2024
हे ही वाचा : Manoj Jrange: मराठा आरक्षणाचा घोळ सुटला का?, जरांगेंना दिलेल्या अधिसूचनेत नेमकं काय?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT