राज ठाकरेंचं अजित पवारांकडे बोट; पवारांच्या राजीनाम्यावर मोठं विधान
राज ठाकरेंनी रत्नागिरीत झालेल्या सभेत शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय का घेतला असावा, याबद्दल मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
शरद पवारांच्या राजीनाम्यावरून महाराष्ट्रात प्रचंड राजकीय गोंधळ बघायला मिळाला. तीन दिवसांनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर पायउतार होण्याचा निर्णय मागे घेतला. या सगळ्या राजकीय घडामोडींवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. याच मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. राज ठाकरेंनी रत्नागिरीत झालेल्या सभेत शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय का घेतला असावा, याबद्दल मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीत सभा झाली. या सभेत राज ठाकरेंनी महाराष्ट्रात गेले तीन-चार दिवस रंगलेल्या राजकीय नाट्यावर भाष्य केलं.
राज ठाकरे शरद पवारांच्या राजीनाम्यावर काय बोलले?
राज ठाकरे म्हणाले, “राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता, तो काल संपला. मी मागे एकदा म्हटलं होतं. जेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं की मी निवडणूक लढवणार नाही. त्यावेळी मी म्हटलं होतं की, पवार साहेब सांगताहेत मी निवडणूक लढवणार नाही, तुमचं काय मत आहे. समोर परत पवार साहेबच उभे आहेत आणि ते म्हणताहेत तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे. मला असं वाटतं की, खरंच त्यांना राजीनामा द्यायचा होता. पण, जेव्हा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्याप्रकारे वागले. ए तू, गप्प बस. ए तू, शांत बस. ए तू माईक हातातून घे.”
…म्हणून पवारांनी राजीनामा मागे घेतला असेल -राज ठाकरे
“हे सगळं पवार साहेबांच्या समोर होत असताना त्यांच्या मनात आलं असणार… अरे, मी आता राजीनामा दिलाय, तर हा माणूस असा वागतोय. खरंच जर दिला, तर हा मला पण सांगेन ए, गप्प बस. मला असं वाटतं की, त्या भीतीपोटी, त्या भीतीपायी त्यांनी राजीनामा मागे घेतला. भानगड नको. हे आता असं वागत, पुढे कसं वागेल?”, असं राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >> “शरद पवारांनी अजित पवारांना मामा बनवलं”, निखील वागळेंचं स्फोटक विश्लेषण
“काय चालू होतं माहिती नाही. काही पोच नाही, काही नाही. पण, आतून उकळ्या फुटत होत्या. की होतंय ते बरं होतंय. त्या दिवशी मी त्या मुलाखतीत सांगितलं होतं की, काकांकडे लक्ष द्या. ते कधी कोणती गोष्ट करतील काही सांगता येत नाही, असो. तो त्यांच्या पक्षातील विषय आहे”, असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावरून रंगलेल्या सगळ्या नाट्यावर भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT