Raj Thackeray and BJP: ‘मला भाजपची ऑफर…’, राज ठाकरेंकडून गौप्यस्फोट; Inside Story
Raj Thackeray and BJP: मनसेला भाजपकडून ऑफर आहे असं विधान राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नवी चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
Raj Thackeray and BJP Offer: मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (14 ऑगस्ट) मुंबईत मनसेची (MNS) एक बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरेंनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या या दाव्यानं राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नेमकं काय सांगितलंय, याबाबतची आतली गोष्ट आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. (raj thackeray said bjp offer to me mns chief reveals inside story maharashtra politics update)
ADVERTISEMENT
‘मला भाजपची (BJP) ऑफर आहे, पण मी अजून याबाबत निर्णय घेतलेला नाही’, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपसोबत असल्यामुळं या ऑफरवर मी निर्णय घेतलेला नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मनसेला भाजपसोबत येण्याची ऑफर आली असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केल्यानं आता निर्णय कधी? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हे ही वाचा >> Eknath Shinde : साताऱ्याहून परतताच शिंदेंचा ठाकरेंवर ‘वार’! म्हणाले, ‘काही लोक…’
राज ठाकरेंनी केला गौप्यस्फोट
राजकारणातील सध्याचा घोळ पाहता महापालिका निवडणुका होणार नाहीत, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना लोकसभेच्या तयारीला लागा असे आदेश दिले आहेत. ‘महाराष्ट्रात सध्या जो राजकीय घोळ झाला आहे त्यावरुन वाटत नाही पालिका निवडणुका आता लागतील, असे वातावरण सध्या दिसत नाही. परंतु आता निवडणुका लोकसभेच्या लागतील. त्यासाठी आम्ही चाचपणी आणि तयारी सुरू केली आहे.’ असंही राज यांनी म्हटलंय.
राज ठाकरे यांना भाजपकडून आलेल्या या ऑफरनंतर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात अनेकदा मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटी घेतल्या आहेत. त्या-त्या वेळी त्या भेटी राजकीय नसल्याचं सांगितलं जात होतं. आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं महाविकास आघाडीला आव्हान देण्यासाठी राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचं बोललं जातं आहे.
हे ही वाचा >> Sharad Pawar Meet Ajit Pawar: ‘सामना’चा अग्रलेख शरद पवारांच्या जिव्हारी, पत्रकारावर संतापले!
युती आणि आघाडी करायची की नाही या गोष्टी परिस्थितीनुसार ठरतात, असं देखील राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आता पनवेलला होणाऱ्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी काही गोष्टी बोलणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं त्या मेळाव्याकडे लक्ष लागून आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT