‘महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या…’, गौतमी पाटीलवर संभाजी राजेंचा यू-टर्न!

मुंबई तक

ADVERTISEMENT

sambhaji raje clarification on dancer gautami patil protection
sambhaji raje clarification on dancer gautami patil protection
social share
google news

Sambhaji Raje Reaction on Gautami Patil : माजी खासदार संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी कलाकारांच्या मागे उभे राहिले पाहिजे, त्यांना संरक्षण दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलवर (Gautami Patil) दिली होती. या त्यांच्या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती. संभाजी राजेंच्या गौतमी पाटीलवरील भूमिकेला 24 तास उलटण्याआधीच त्यांनी आता यु टर्न घेतला आहे. कलाकाराची ‘कला’ मी बघितली, आता असे वाटते, अशा ‘कले’ला संरक्षण नको रे बाबा,अशी प्रतिक्रिया संभाजी राजेंनी देत स्पष्टीकरण दिले आहे. (sambhaji raje clarification on dancer gautami patil protection reaction-on-media)

ADVERTISEMENT

गौतमी पाटीलवर काय म्हणाले ?

महिला स्वातंत्र्य आहे, महिलांनी त्यांची गुण, कर्तृत्व दाखवलं पाहिजे. त्यामुळे महिलांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,कलाकाराला संरक्षण मिळालं पाहिजे,अशी प्रतिक्रिया संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी गौतमी पाटीलवर (Gautami Patil) दिली होती.या भूमिकेसह गौतमी पाटीलच्या पाटील आडनावावरून होत असलेल्या वादावर देखील प्रतिक्रिया दिली होती. अनेक अनेक लोकांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. पाटील मराठा समाजातीलच नव्हे तर इतर समाजातील लोक ही वापरतात.मी यात बोलून वेगळा विषय वाढेल, त्यामुळे ते बरे नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

हे ही वाचा : Gautami Patil : गौतमी पाटीलवर बार्शीत गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?

संभाजी राजेंचा घुमजाव

संभाजी राजेंच्या गौतमी पाटीलला (Gautami Patil) सरंक्षण देण्याच्या भूमिकेची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती. या चर्चेनंतर आता संभाजी राजे यांनी गौतमी पाटीलच्या भूमिकेवर यु टर्न घेतला आहे. काल एका पत्रकाराने एका महिलेचा “कलाकार” असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात असल्याचा मला प्रश्न विचारला होता. तत्पुर्वी मला त्या (गौतमी पाटीलची) व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती. पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. पण आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर मी कलाकाराची “कला” बघितली. आता असे वाटते आहे, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण !, अशी संभाजी राजे यांनी पुन्हा एकदा भूमिका मांडत स्पष्टीकरण दिले आहे.

हे वाचलं का?

उदयनराजे काय म्हणाले होते?

दरम्यान काही दिवसांपुर्वीच गौतमी पाटीलने उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. या भेटीत तिने उदयनराजेंना खास त्यांचा आवडीचा परफ्यु्म भेट दिला होता. या भेटीवर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली होती. गौतमी पाटील ह्या कलाकार आहेत. जो कलेची दाद देतो, त्यांच्याकडे त्या जाणार ना. कलेची जाण नसणाऱ्याकडे त्या का जातील? आगामी चित्रपट आणि इतर प्रकल्पासाठी माझ्याकड़ून काही सहकार्य मिळावे यासाठी त्या आल्या होत्या, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडिओ अन् अल्पवयीन मुलासह एकाला अटक

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT