‘लफंगा, बदमाश, निर्लज्ज’; संजय राऊतांचा तोल सुटला, नार्वेकरांना डिवचलं
राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 54 आमदारांचा निर्णय घेऊ असं म्हणत अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाच्या आमदारांवरही अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे संकेत दिले. त्यावरून संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली.
ADVERTISEMENT
sanjay raut on mla disqualification : 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांचा बोलताना संयम सुटला. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 54 आमदारांचा निर्णय घेऊ असं म्हणत अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाच्या आमदारांवरही अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे संकेत दिले. त्यावरून संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेची तोफ डागली.
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “हुकुमशाहीचा पराभव सामन्य जनता करू शकते, हे पुन्हा एकदा दिसून आलं. जे 1978 साली इंदिरा गांधींच्या बाबतीत झालं होतं, त्याची सुरूवात कर्नाटकपासून सुरू झाली आहे. त्याच्यामुळे कर्नाटक तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, पेक्षा कर्नाटक तो झांकी है पूरा देश अभी बाकी है. आम्ही 2024 ची तयारी करतोय.”
हेही वाचा >> Sunil Kanugolu : काँग्रेसला दिलं कर्नाटक जिंकून! कोण आहेत कानुगोलू?
“महाराष्ट्र हे तर भाजपने लुटलेलं राज्य आहे. ही लूट आहे. ही काही नैतिकता नाही. त्यामुळे लुटीचं राज्य त्यांच्याकडे फार टिकणार नाही. आजचं मी बघितलं की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लंडनमधून मुलाखत देताहेत की, शिवसेनेचे उर्वरित 16 आमदार कसे अपात्र होतील. याविषयी तिकडे प्रवचनं करत आहेत”, असं राऊत म्हणाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
राहुल नार्वेकरांना पक्षांतराचा छंद, संजय राऊत काय बोलले?
राहुल नार्वेकरांनी केलेल्या विधानावर बोलताना खासदार राऊत म्हणाले, “हे जे नार्वेकर आहेत, त्यांच्या पक्षांतराचा इतिहास फार मोठा आहे आणि पक्षांतर हा त्यांचा छंद आहे. पक्षांतरावर उत्तेजन देणं, हा त्यांचा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्ही करत नाही. आम्ही फक्त सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचं पालन करायला सांगतो आहोत. नाहीतर महाराष्ट्र काय आहे, हे आम्हाला दाखवावं लागेल, ही धमकी नाहीये. परत म्हणतील आम्हाला धमकी दिली.”
“कायद्याचं पालन करा हे आम्ही सांगतोय. पक्षांतराला उत्तेजन देऊन तुम्ही लोकशाही आणि स्वातंत्र्याची जी हत्या करताये, ती आम्ही होऊ देणार नाही. शिवसेनेचे 16 आमदार सुद्धा आमच्या अखत्यारित येतील. आम्ही त्यांच्यावर कारवाई करू वगैरे, या भूलथापा बंद करा. तुम्ही खरंच वकील असाल, तर न्यायालयाचा निर्णय पुन्हा वाचा”, असा सल्लाही राऊतांनी दिला.
ADVERTISEMENT
लॉर्ड फॉकलंड आहात का? नार्वेकरांना राऊतांचा सवाल
याच मुद्द्यावर पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “आपण काय म्हणताहेत की आम्हाला अमर्याद वेळ आहे निर्णय घेण्यासाठी. या देशाच्या न्यायव्यवस्थेत, लोकशाहीत कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्यावा लागतो आणि वेळेचं बंधन असतं. तुम्ही कोण असे लॉर्ड फॉकलंड लागून गेलेला आहात? आज ब्रिटिशांचा कायदा चालत नाही. हे भारतीय संविधान आहे हे लक्षात घ्या.”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Karnataka Results 2023 : भाजपचं टेन्शन वाढलं! 2024 मध्ये असा होणार परिणाम?
“हे वेळकाढूपणा हे त्यांचं धोरण आहे. ते त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतील. पण, हे वेळकाढू धोरण फार चालणार नाही. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे वेळकाढू प्रकरणाचा फायदा ज्यांनी महाराष्ट्राची लूट केली आहे, त्यांना होणार नाही”, असंही ते यावेळी म्हणाले.
भगतसिंह कोश्यारींवर संतापले, राऊत म्हणाले, निर्लज्ज, बदमाश…
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “त्यांना निर्णय लवकर द्यावा लागेल. का देणार नाहीत? त्यांचा छंद आहे पक्षांतर आणि व्यवसायही आहे. तरीही हा निर्णय त्यांना लवकर द्यावा लागेल. त्यासाठी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आम्हाला घेऊ दिली नाही. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर. ते सहज शक्य होतं. बहुमताचं सरकार होतं. पण, या बदमाश राज्यपालांनी, हा जो लफंगा राज्यपाल बसवला होता, त्याने ती निवडणूक होऊ दिली नाही.”
“दिल्लीचे आदेश होते. कारण त्यांचं कारस्थान मोठं होतं. त्यामुळे अशी व्यक्ती बसवली ज्याला लोकशाहीची चाड नाही. पक्षांतराविषयी राग नाही, पक्षांतर हा त्यांचा छंद आहे. अशा व्यक्तीला घटनेच्या प्रमुख खुर्चीवर बसवून शिवसेनेच्या बाबतीत हवे, ते निर्णय करून घेणे. लक्षात घ्या इतिहासात तुमची नोंद काळ्याकुट्ट अक्षरात होईल. भविष्यात तुम्हाला रस्त्यावर फिरणं मुश्कील होईल. ही मराठी जनता तुम्हाला सोडणार नाही. आज राज्यपालांची महाराष्ट्रात काय अब्रू राहिली आहे. निर्लज्ज राज्यपाल म्हणून त्यांची नोंद होते आहे. विधानसभा अध्यक्षांनी आपलं पद आणि प्रतिष्ठा सांभाळावी, एवढंच मी सांगेन”, असं संजय राऊत नार्वेकरांना उद्देशून म्हणाले.
ADVERTISEMENT