Maharashtra political Crisis : ‘तुम्ही पक्षपाती आहात’, संजय राऊत भडकले
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : सुप्रीम कोर्टातील निकाल येण्याआधीच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या टीका केली. तुम्ही पक्षपाती आहात, असा गंभीर आरोप राऊतांनी केला.
ADVERTISEMENT
Sanjay Raut On supreme court Verdict, Maharashtra Political crisis : सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्त्वपूर्ण निकाल देणार आहे. या निकालाच्या आधी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला.
ADVERTISEMENT
मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “विधासभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसले होते उपाध्यक्ष असलेले आमचे नरहरी झिरवळ. त्यांनी 16 आमदारांच्या बाबतीत जो निर्णय दिला, तो कायदा, घटना हे पाहून त्यांनी निर्णय दिला. ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं.”
तुमची नियुक्तीच घटनाबाह्य -संजय राऊत
संजय राऊत पुढे असं म्हणाले की, “आताचे विधानसभा अध्यक्ष सांगताहेत की, निर्णय माझ्याकडेच येईल. म्हणजे कुणाकडे येईल. तुम्ही पक्षपाती आहात. तुम्ही घटनाबाह्य सरकार बनवलं आहे. तुमची नियुक्तीच घटनाबाह्य आहे विधानसभा अध्यक्षपदी. त्यामुळे निर्णय तुमच्याकडे येऊ शकत नाही. तो निर्णय तेव्हाचे अध्यक्ष, जे त्या खुर्चीवर बसलेले होते. कायद्याने आणि घटनेने नरहरी झिरवळ यांच्याकडे तो निर्णय यायला पाहिजे, असं मला म्हणायचं आहे”, असं सांगत संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Ulhas Bapat : Eknath Shinde की Uddhav Thackeray, सुप्रीम कोर्टात कोण जिंकणार?
आमचा न्यायावर विश्वास, निकालाआधी राऊत काय म्हणाले?
“सर्वोच्च न्यायालयाकडून मला काही अपेक्षा नाही. मला न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही न्याय विकत घेणारी माणसं नाही आहोत. जे न्याय विकत घेऊ शकतात, ते सत्तेवर आहेत. निर्णय आमच्या बाजूने लागेल वगैरे याबद्दल त्यांना जी खात्री वाटतेय, ही आम्ही न्याय विकत घेऊ शकतो हा मस्तवालपणा आहे. आम्ही तसं म्हणणार नाही. आमचा न्यायावर विश्वास आहे. घटनापीठाने सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली प्रदीर्घ काळ ही सुनावणी घेतली. दोन्ही भूमिका ऐकलेल्या आहेत. मला असं वाटतं की, आज ते निर्णय देतील आणि निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत”, असं मत संजय राऊत यांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केलं.
हेही वाचा >> Maharashtra Political Crisis: शिंदेंनी शिवसेना फोडली अन्.. बंडानंतर आजवर काय-काय घडलं?
“जसा शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. तसाच ज्यांनी देशाला घटना दिली त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, सर्वोच्च न्यायालय संविधानाची आणि लोकशाहीची हत्या करणार नाही. मी कालही म्हणालो की आजचा फैसला हे स्पष्ट करेल की या देशात लोकशाही आहे की, नाही. या देशात स्वातंत्र्य टिकलंय की, नाही. या देशात संसद, विधानसभेचं महत्त्व आहे की, नाही. या देशात न्यायालये स्वतंत्र आहेत की नाही, याचा फैसला आज होईल. आजच्या निकालाने स्पष्ट होईल की, आपल्या देशात, लोकशाही, स्वातंत्र्य आणि न्याय व्यवस्था आहे”, असं भाष्य खासदार संजय राऊत यांनी केलं.
ADVERTISEMENT
‘निकालाआधी बोलणं मुर्खपणा’, फडणवीसांच्या टीकेवर राऊत काय म्हणाले?
सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी बोलणं म्हणजे मुर्खपणा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होत. त्यांच्या या विधानावर राऊत म्हणाले, “तेच बोलताहेत. आम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. निकाल आमच्या बाजूने लागेल. हा मुर्खपणा कोण करतंय. आता जर त्यांना बुद्धी सुचली असेल, तर त्यांना सत्याची जाणीव झाली असेल. किंबहुना ते आणि ज्यांना त्यांनी मांडीवर घेतलं आहे, ते मुर्ख सगळे… ते मुर्खच बोलताहेत निकाल आमच्या बाजूने लागेल. असं बोलणं सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT