कोल्हापुरात पाटील-महाडिक वाद पेटणार! साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना बेदम मारहाण
राजाराम कारखान्याच्या निवडणूकीत 21-0 असा निकाल सभासदांनी दिला. तेव्हापासूनच सभासदांनी केलेला अपमान त्यांच्या मनात सलत असावा, त्यामुळे ते मनोरूग्ण झाले आहेत, अशी टीका सतेज पाटलांवर धनंजय महाडिक यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) आणि खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या गटातील वाद चांगलाच चिघळला आहे. या घटनेत मंगळवारी सकाळी सतेज पाटील काही शेतकऱ्यांसह मार्केट यार्ड परिसरातील साखर सहसंचालक कार्यालयात कारखाना प्रशासनाविरूद्ध तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे (Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory) कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. या मारहाणीत आता सतेज पाटलांचा हात असल्याचा आरोप धनंजय महाडिक यांनी केला आहे. त्यामुळे राजाराम कारखान्यातील राजकारणानं पुन्हा एकदा वेगळं वळण घेतलं असून, महाडिक विरुद्ध पाटील वाद पेटण्याची शक्यता आहे. (satej patil vs dhananjay mahadik md of rajaram sugar factories were brutally beaten kolhapur politics)
ADVERTISEMENT
कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याकडून विरोधी गटाचा ऊस तोडून नेला जात असल्याचा जाब विचारण्यासाठी आमदार सतेज पाटील मार्केट यार्ड परिसरातील साखर सहसंचालक कार्यालयावर धडक दिली होती. यानंतर सायंकाळच्या सुमारास राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. कारखान्यातील कामकाज संपवून चिटणीस आपल्या गाडीतून घरी निघाले होते. यावेळी कसबा बावड्यात सतेज पाटील गटाच्या काही शेतकर्यांनी चिटणीस यांची गाडी अडवली आणि कारखान्याच्या गाळपासाठी आमचा ऊस का नेला जात नाही, अशी विचारणा करत प्रकाश चिटणीस यांच्यावर हात टाकला.त्यांना गाडीतून अक्षरशः बाहेर ओढून काढत रस्त्यावर कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली होती.
हे ही वाचा : Crime : मुलगी दलित मुलाच्या प्रेमात, बापाने फावड्याने दोघांचेही केले तुकडे
मारहाणीच्या या घटनेनंतर कोल्हापूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये एमडी प्रकाश चिटणीस यांना उपचाराखातर दाखल करण्यात आले होते. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह कार्यकर्त्यांनी चिटणीस यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर धनंजय महाडिक यांनी चिटणीस यांच्या मारहाणीमागे सतेज पाटील यांचा हात असल्याचा आरोप केला. सतेज पाटील गटाचा राजाराम कारखान्यात पराभव झाल्यामुळेच ही मारहाणीची घटना घडल्याचे महाडिक यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागी देखील महाडिक यांनी केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सतेज पाटलांवर कठोर कारवाईची मागणी
राजाराम कारखान्याची निवडणूक पाच-सात महिन्यापूर्वी झाली. या निवडणूकीत 21-0 असा निकाल सभासदांनी दिला. तेव्हापासूनच सभासदांनी केलेला अपमान त्यांच्या मनात सलत असावा, त्यामुळे ते मनोरूग्ण झाले आहेत, त्याची स्वताची बुद्धी किंवा विचार उरला नाही आहे. या निवडणूकीत बंटी पाटील गटाचा दारूण पराभव झाला. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. सत्ता नसली की ते थोड विचित्र वागतात, अशा शब्दात धनंजय महाडीक यांनी सतेज पाटलांवर टीका केली.
हे ही वाचा : Hit And Run: अखेर समेट झाला! ट्रक चालकांना संप मागे घेण्याचे आवाहन
मंगळवारी सकाळी त्यांनी ऊस वेळेवर जात नसल्याचा आरोप केला. त्यानंतर संध्याकाळी लगेच कारखान्याचे एमडी यांचा पाठलाग करून त्यांना अडवून त्यांचे कपडे फाटेपर्यंत आणि रक्तस्त्राव होईपर्यंत मारहाण केली. हा पुर्वनियोजित कट होता. या मारहाणीमागे कटकारस्थान असून यामागे बंटी पाटील यांचा हात असल्याचा आरोप करत पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनंजय महाडिक यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT