Uddhav Thackeray: ‘जय भवानी-जय शिवाजी म्हणा अन् मतदान करा’, ठाकरेंनी केलं मोदी-शाहांना टार्गेट

रोहित गोळे

ADVERTISEMENT

say jai bhavani jai shivaji and vote uddhav thackeray sends letter to election commission alleging that pm modi and amit shah violated code of conduct
say jai bhavani jai shivaji and vote uddhav thackeray sends letter to election commission alleging that pm modi and amit shah violated code of conduct
social share
google news

Uddhav Thackeray Attack on PM Modi and Amit Shah: मुंबई: ‘आमचे पंतप्रधान मतदान करताना बजरंग बली की जय.. बोलून मतदान करा असं सांगतायेत.. तर मग हा नियम निवडणूक आयोगाने शिथील केला असेल तर येत्या निवडणुकीत मी माझ्या जनतेला आवाहन करतो की, जय भवानी-जय शिवाजी म्हणून मतदान करा..’ असं म्हणत शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट टार्गेट केलं आहे. (say jai bhavani jai shivaji and vote uddhav thackeray sends letter to election commission alleging that pm modi and amit shah violated code of conduct)

ADVERTISEMENT

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग बली की जय म्हणत मतदान करा असं म्हटलं होतं. तर दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जे भाजपला मतदान करतील त्यांना अध्योयेला रामलल्लाचं मोफत दर्शन करून देण्यात येईल असं विधान केलं. जे निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन आहे. असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. याच मुद्दावरून त्यांनी आजच्या (16 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत मोदी-शाहांवर निशाणा साधला.

हे ही वाचा>> Nana Patekar : ‘चूक झाली माफ करा पण…’, टपली मारलेल्या Video वर पाटेकर अखेर बोलले!

उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्ला, पाहा नेमकं काय म्हणाले ठाकरे..

अनेकदा असं वाटतं की, भाजप सत्तेवर बसलाय म्हणून त्यांना फ्री हीट द्यायची आणि आम्ही काही केलं की, आमची मात्र हिट विकेट काढायची. याला काही मोकळ्या वातावरणातील निवडणुका म्हणू शकत नाही. स्पष्ट बोलायचं म्हणजे.. 1997 साली पार्ल्यात जी पोटनिवडणूक झाली होती आमच्याकडून डॉ. रमेश प्रभू विजयी झाले होते. भाजप तेव्हा आमच्याविरोधात लढला होता.

ही पहिली निवडणूक.. पोटनिवडणूक असली तरी.. ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली गेली नाही तर जिंकलीही.

याची आठवण यासाठी करून दिली की, त्या निवडणुकीपासून अगदी 95 साली आमचं सरकार आलं तोपर्यंत आमचे पाच ते सहा आमदार.. हे बाद ठरवले गेलेच पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी होती की, लोकशाहीमधला सगळ्यात मुलभूत जो मतदानाचा अधिकार आहे तो यांच्यासह शिवसेनाप्रमुखांचां सुद्धा सहा वर्षांसाठी काढून घेण्यात आला होता. कारण काय होतं.. तर हिंदुत्वाचा प्रचार केला.

वातावरण तेव्हा असा होता की, दुसरं कोणीही हिंदुत्वाबद्दल बोलू शकत नव्हतं. गर्व से हम हिंदू है.. हा नारा विश्व हिंदू परिषदेने दिला असेल पण तो बुलंद केला असेल तर तो शिवसेनाप्रमुखांनी केला..

मंदिर वही बनायेंगे ते दिवस होते. निवडणुका तेव्हा जोरात लढल्या जात होत्या. केवळ आणि केवळ हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून या सर्वांवर कारवाई केली. हिंदुहृदयसम्राटांवर सुद्धा जे कधी निवडणूक लढणारच नव्हते त्यांना निवडणुकीपासून लांब ठेवण्यात आलं. परत एकदा सांगतो की, मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता.

आज मात्र आम्हाला जरा असं वाटतं की, निवडणूक आयोगाने आचारसंहितेत काही बदल केले आहेत का? बदल केले असतील तर आम्हाला अडचण काहीच नाही. जर केले असतील तर ते सर्वांना सारखेच असायला हवे.

हे एवढ्यासाठी सांगतोय की, काही महिन्यांपूर्वी ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यात कर्नाटक हे असं राज्य होतं की, जिथे स्वत: पंतप्रधान मोदींनी बजरंग बली की जय बोलून मतदानाचं बटण दाबण्याचं आवाहन केलं होतं.

काल-परवा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेश निवडणुकीत जर तुम्ही भाजपला निवडून दिलं तर अयोध्याला जायला खर्च येणार नाही.. जे आम्हाला मतं देतील त्यांना आम्ही रामलल्लाचं दर्शन फुकट देऊ. असं त्यांनी जाहीर केलेलं.

ज्याअर्थी आमचे पंतप्रधान मतदान करताना बजरंग बली की जय.. बोलून मतदान करा असं सांगतायेत.. तर मग हा नियम निवडणूक आयोगाने शिथील केला असेल तर येत्या निवडणुकीत मी माझ्या जनतेला आवाहन करतो की, जय भवानी-जय शिवाजी म्हणून मतदान करा.. हर-हर महादेव म्हणून मतदान करा, जय श्रीराम म्हणून मतदान करा आणि राज्याकर्त्यांना सुबुद्धी मिळो म्हणून तुम्ही गणपती बाप्पा मोरया म्हणून देखील तुम्ही मतदान करा..

याबाबत निवडणूक आयोगाने खुलासा करण्याची गरज आहे. हे बंधन जे पूर्वी होतं. ज्यावरून शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता मग तो योग्य होता की, आता हे जे पंतप्रधान आणि गृहमंत्री जे करत आहेत ते योग्य आहे हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे..

मला असं वाटतं की, देशाच्या जनतेला आणि आम्हाला देखील उत्सुकता आहे की, आचारसंहितेत त्यांनी काही बदल केला असेल तर तेव्हा केला, कधी केला आणि तो केवळ भाजपलाच सांगितला आणि आम्हाला का सांगितला नाही? ही सुद्धा आमची रास्त मागणी आहे.

याबद्दल एक पत्र आम्ही निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. पूर्वी या सगळ्या गोष्टींची दखल निवडणूक आयोग स्वत: घेत होती. आता देखील मला कळलं की, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी, केजरीवाल यांना निवडणूक आयोगाने स्वत:हून नोटीसा पाठवल्या आहेत. म्हणजे निवडणूक आयोग जागरूक आहे.

मोदी किंवा शाह यांनी केलं असेल तर ते चुकीचं आहे असं काही माझं म्हणणं नाही.. पण जर केलं असेल तर आम्ही जे केलं होतं ते योग्य की अयोग्य ते एक कळू द्या. आता त्यात ढिलाई आणली असेल तर आम्ही सुद्धा तसा प्रचार करू शकतो की नाही हे त्यांनी आम्हाला सांगावं.

हे ही वाचा>> Mohammed Shami: तीन वेळा आत्महत्येचा विचार… संघर्षातून असा घडला मोहम्मद शमी!

आता उद्धव ठाकरेंनी थेट मोदी-शाहांवर चढवलेल्या हल्ल्यानंतर भाजपकडून याबाबत नेमकं काय प्रत्युत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT