NCP: उत्तराधिकाऱ्याबद्दल शरद पवार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…
Sharad Pawar NCP: शरद पवार यांनी आपला राजीनाम्याचा निर्णय जरी मागे घेतला असला तरी त्यांनी उत्तराधिकारी तयार करण्याबाबतही भाष्य केलं आहे. पाहा शरद पवार याबाबत नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
Sharad Pawar Lastest News: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीत बरीच उलाथापालथ झाली. शरद पवार राजीनामा मागे घेणार की नाही इथपासून पवारांची जागा कोण घेणार या सगळ्याबाबत बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली. पवारांचा उत्तराधिकारी (successor) सुप्रिया सुळे (Supriya Sule) असणार की, अजित पवार (Ajit Pawar) या मुद्द्यावर देखील बराच खल झाला. अखेर तीन दिवसानंतर शरद पवारांनी यथावकाश आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. पण याचवेळी जेव्हा त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्यावर खास त्यांच्याच स्टाइलमध्ये उत्तर देत या प्रश्नाला चलाखीने बगल दिली. (see what ncp chief sharad pawar said about his successor for first time supriya sule or ajit pawar)
ADVERTISEMENT
सुप्रिया सुळे किंवा अजित पवार या दोघांपैकी एकाचंही नाव न घेता शरद पवार यांनी असं म्हटलं की, ‘हे आम्ही जे बसलो आहोत ही आमची टीम हे सगळे पक्ष चालवू शकतात. आम्ही राज्यही चालवू शकतो आणि देशही चालवू शकतो.’ त्यामुळेच पवारांच्या मनात नेमकं काय सुरुय याचा थांग अद्याप तरी लागलेला नाही.
हे ही वाचा >> NCP: अवघं राजकारण ढवळून काढणाऱ्या शरद पवारांच्या राजीनाम्याचे 6 अर्थ…
मात्र, पत्रकात परिषदेत शरद पवार सुरुवातीला असे म्हणाले होते की, ‘मी पुनश्च: अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल.’
हे वाचलं का?
कोण असेल पवारांचा उत्तराधिकारी?
तुमचा उत्तराधिकारी कोण असेल यावर शरद पवार म्हणाले की, ‘हे आम्ही जे बसलो आहोत ही आमची टीम हे सगळे पक्ष चालवू शकतात. आम्ही राज्यही चालवू शकतो आणि देशही चालवू शकतो. या सगळ्या लोकांना संधी मिळाली पाहिजे म्हणून मी मागे जात होतो. पण त्यांनी ते मान्य केलं नाही.. काय करु मी.’
‘उत्तराधिकारी असा किती दिवसात ठरत नसतो. लोक एकत्र काम करतात उद्याचाला काही जागा रिक्त होतात.. त्याठिकाणी काय करावं हे सगळे मिळवून ठरवत असतात. हा एका व्यक्तीचा निर्णय असू शकत नाही.’
हे ही वाचा >> नरेंद्र मोदी शिवसेनेपेक्षा ‘राष्ट्रवादी’साठी आग्रही होते; शरद पवारांचा गौप्यस्फोट
‘उत्तराधिकारी ही संकल्पना त्या ठिकाणी नाही. पण ही गोष्ट जरुर मनात आहे आणि मी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करेन की, पक्षात काही नवीन सहकाऱ्यांना संधी दिली पाहिजे. उदा. जे लोकं जिल्हा पातळीवर कामं करतात 10-15 वर्ष कामं करतात ती लोकं राज्य पातळीवर देखील कामं करू शकतात. राज्य पातळीवर काम करणारे अनेक लोकं आहेत जे देशाच्या पातळीवर कामं करू शकतात. असं गणित आमच्याकडे आहे. त्यांना प्रोत्साहित करणं, संधी देणं.. ही जबाबदारी मी आणि माझ्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांनी पार पाडायची आहे. खरं तर भाकरी थांबवली.. मी फिरवायला निघालो होतो.’ असं शरद पवार यावेळी म्हणाले.
त्यामुळे आपला उत्तराधिकारी कोण असेल हे अद्यापही शरद पवार यांनी गुलदस्त्यातच ठेवलं आहे. पण मागील तीन दिवसातील पवारांचं राजकारण लक्षात घेतल्यास पवारांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यासाठी आतापासूनच राजकीय मशागत सुरू केलीए एवढं मात्र नक्की.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT