नाना पाटेकर निवडणूक लढविणार का? शरद पवारांच्या विधानाने…
नाना पाटेकर खडकवासला मतदार संघातून निवडणूक लढवणार का ? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आल्यावर म्हणाले की हे तुमच्याकडूनच ऐकतो आहे. मात्र नाना माझे चांगले मित्र आहे, मात्र यावर कधी ते बोलले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
Sharad Pawar : सध्या देशासह राज्यातील राजकारण अनेक मुद्यांनी ढवळून निघाले आहे. त्यातच आता अनेक दिग्गज नेते वेगवेगळ्या भागाचा दौरा करत असल्यामुळेही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) प्रमुख शरद पवार यांचा अमरावती (Amravati) दौरा होता. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांची थेट उत्तरं दिली. यावेळी त्यांनी अभिनेता नाना पाटेकर (Actor Nana Patekar) खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढविणार का असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवारांनी एकाच वाक्यात उत्तर देत तशी चर्चा ही तुमच्याकडूनच ऐकतोय म्हणत त्यांनी त्यावर पडदा पाडला.
ADVERTISEMENT
मी अजून ऐकलं नाही
शरद पवार यांनी अमरावती दौऱ्यात केंद्र सरकारसह त्यांनी आगामी काळातील होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर स्पष्ठपणे बोलत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी शरद पवार यांना नाना पाटेकर खडकवासला मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे का ? असा सवाल पत्रकारांनी करताच त्यांनी थेट उत्तर देत हे असं मी अजून तरी ऐकलं नसल्याचे सांगितले. शरद पवारांनी यावेळी अनेक प्रश्नांची उत्तर देत त्यांनी केंद्र सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला.
हे ही वाचा >> पुणे हादरलं! कॉलेजजवळच 10 सिलिंडर फुटले, नेमकं प्रकरण घडलं कसं?
नाना पाटेकरांचं भाकीत
नाना पाटेकर यांनी नुकताच एका दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत भाजपला 350-375 जागा मिळतील आणि पुन्हा भाजप सत्तेत येईल असं भाकीत त्यांनी वर्तवलं होतं. त्याचबरोबर भाजप देशात उत्तम काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप पक्षाला नक्कीच यश मिळेल आणि आणि पुन्हा नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील असं स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा नाना पाटेकरांच्या या निवडणूक लढवण्याविषयी विचारले असता शरद पवारांनी ही गोष्ट मी तुमच्याकडून ऐकतोय असंही स्पष्टपणे त्यांनी सांगितले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
नाना पाटेकर माझे मित्र
यावेळी ते म्हणाले की, खडकवासला हा माझ्या मतदार संघ माझ्या घराजवळ आहे, त्याचबरोबर अभिनेता नाना पाटेकर हे माझे मित्र आहेत. मात्र याबाबत अजून तरी तसं काही बोलणं झालं नसल्याचे सांगत हे मी माध्यमांमधूनच ऐकतोय असंही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपकडून स्वार्थी राजकारण
शरद पवार यांनी भाजपवर टीका करत त्यांनी निलंबित केलेल्या खासदारांवरूनही त्यांनी केंद्रावर निशाणा साधला. प्रश्न विचारणं ही त्यांची चूक आहे का असा सवालही त्यांनी यावेळी केला. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून त्यांचा राजकीय फायद्यासाठी भाजपकडून वापर केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Madhuri Dixit : माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार? मुंबई Tak च्या मुलाखतीत स्पष्टच सांगितलं
ADVERTISEMENT