“आ गए गद्दार”, शरद पवार शिंदेंवर बरसले, मोदींवरही चढवला हल्ला!
देशात अनेक ठिकाणी लोकांना बदल हवा आहे, पण तो बदल अन्य मार्गाने करण्यासाठी लोकांनी निर्णय घेऊन सुद्धा सरकारे उलथी पालथी करण्याचे काम देशाच्या नेतृत्वाकडून केले जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
ADVERTISEMENT
sharad pawar criticize pm narendra modi and cm eknath shinde :सत्तेचा गैरवापर हा निवडणूकीत कसा केला जातो हे भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशाला दाखवून दिलंय. देशात अनेक ठिकाणी लोकांना बदल हवा आहे, पण तो बदल अन्य मार्गाने करण्यासाठी लोकांनी निर्णय घेऊन सुद्धा सरकारे उलथी पालथी करण्याचे काम देशाच्या नेतृत्वाकडून केले जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. (sharad pawar criticize pm narendra modi and cm eknath shinde solapur sangola program)
ADVERTISEMENT
महाराष्ट्र राज्य लोणारी समाज सेवा संघ शाखा सांगोला यांच्या वतीने आमदार रविंद्र धंगेकर यांचा समाजाच्या वतीने भव्य सत्कार कार्यक्रम सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात कॉग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि शरद पवार उपस्थित होते. याप्रसंगी शरद पवार बोलत होते.यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेवरही टीका केली.
हे ही वाचा : शरद पवारांनी पंढरपुरात ‘भाकरी’ फिरवली, ‘मविआ’चा उमेदवार ठरला!
एकनाथ शिंदेवर टीका
महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार होतं, मात्र काही लोक बाजूला गेले, कशालाठी गेले? काय पदरात पडलं? हे त्यांचे त्यांना माहिती, पण त्याचा निकाल महाराष्ट्राच्या जनतेला पसंत पडला नाही, अशी टीका शरद पवार यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. राज्यात सरकार एकनाथ शिंदेंचे झाले, पण त्या शिंदेंच्या सरकारला लोकांचा पाठींबा किती आहे, याचा विचार करण्याची आता वेळ आलीय, असे देखील पवार म्हणाले आहेत.
गद्दार, खोकेचा किस्साही सांगितला
शरद पवार यांनी यावेळी सावंतवाडीतला एक किस्सा ही सांगितला. सावंतवाडीत मी रस्त्याने फिरायला निघालो, आणि माझ्यासमोरून एक गाडी गेली. ही गाडी मनसेची होती आणि त्या गाडीवर तिरंगा होता. त्याचवेळी रस्त्यावरून काही पाचवी-सहावीचे विद्यार्थी चालले होते. या विद्यार्थ्यांनी ”आ गए गद्दार, आ गए गद्दार,” ”खोके वाले आ गए”, ”खोके वाले आ गए,” अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. आज गावच्या लहान मुलांच्या तोंडातही खोकं आणि खोकेवाला हा शब्द बसलाय, असे देखील शरद पवार म्हणाले.
दरम्यान महाराष्ट्रात जी महाविकास आघाडी झालीय. या आघाडीला शक्ती देणे, पाठींबा देणे आणि महाराष्ट्राच उद्याच राजकारण स्वच्छ करण्यासाठी ही आघाडी महत्वाचे काम करू शकेल, याची खात्री नागरीकांना असल्यामुळे त्या रस्त्याने जायचा निर्णय़ आपण घेतला पाहिजे,असे देखील शरद पवार म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पत्रकार परिषद शरद पवारांची, पण चर्चा सोनिया दुहानांची, त्या कोण आहेत?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT