“निवडणुकीमुळे…”, 14 श्री सदस्यांच्या मृत्यूवरून शरद पवार संतापले, शिंदेंवर घणाघात
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात मृत्यूमुखी पडलेल्या 14 श्री सदस्यांच्या मृत्युवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात मृत्यूमुखी पडलेल्या 14 श्री सदस्यांच्या मृत्युवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची जबाबदारी सरकारची असते आणि निवडणुकांच्या अनुषंगाने वातावरण तयार करण्यासाठी ही गर्दी जमवली होती आणि निष्काळजीपणा केला,” असं म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर पवारांनी घणाघात केला.
ADVERTISEMENT
मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात शरद पवार बोलत होते. “मी जितेंद्र आव्हाडांचं भाषण ऐकत होतो. काय घडलं खारघरला? खारघरला घडलं, त्यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याचा जयंतरावांनी उल्लेख केला. महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम राज्य सरकारचा कार्यक्रम आहे. राज्य सरकारचा कार्यक्रम असतो, त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या आयोजनाची निमंत्रितांची ही जबाबदारी शंभर टक्के राज्य सरकारवर असते”, असं म्हणत शरद पवारांनी खारघरमध्ये घडलेल्या दुर्घटनेला शिंदे-फडणवीस सरकारला जबाबदार धरलं.
“मला आठवतं की,…”, शरद पवारांनी सांगितली आठवण
शरद पवारांनी पद्म पुरस्काराची आठवण यावेळी सांगितली. ते म्हणाले, “मला आठवतं की एकदा मला केंद्र सरकारने पद्म विभूषण दिलं. पद्म विभूषण घेण्यासाठी जावं कुठं लागलं, तर राष्ट्रपती भवनला. आयोजित कुणी केलं केंद्र सरकारने. हजर लोक किती होते, माझ्या कुटुंबीयांच्या वतीने मित्रांच्या वतीने एकूण 10 लोक. यापेक्षा कुणाला परवानगी नाही. त्याचं महत्त्वाचं कारण हा कार्यक्रम सरकारी होता. केंद्र सरकारचा होता. महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम सुद्धा धर्माधिकारींच्या सन्मानार्थ होता. हा कार्यक्रम धर्माधिकाऱ्यांच्या संघटनेनं आयोजित केलेला नव्हता, तो महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेला होता”, असं शरद पवार म्हणाले.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> आप्पासाहेब धर्माधिकारींच्या ‘श्री समर्थ बैठकी’त नेमकी काय मिळते शिकवण?
“त्याठिकाणी… मला नक्की आकडा माहिती नाही. कुणी 10 लोक म्हणत आहेत. कुणी 15 लोक, कुणी 24 लोक म्हणताहेत. काय असेल तो असेल आकडा, पण लोक मृत्युमुखी पडले. मृत्युमुखी पडले, केवळ राज्य सरकारने खबरदारी घ्यायची होती, ती खबरदारी घेतली नाही. प्रचंड उन्हाळा, उष्माघाताची शक्यता आणि असं असताना सुद्धा हा कार्यक्रम उघड्यावर घेतला जातो”, असा घणाघाती हल्ला शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.
त्याची किंमत काही निष्पाप लोकांना द्यावी लागली; शरद पवार संतापले
“आज तुम्ही पक्षाचं शिबीर उन्हाळ्यात घेतलं, पण तुम्ही चांगली व्यवस्था केली. उत्तम प्रकारचा मंडप टाकला. वाईट प्रसंग येणार नाही याची काळजी घेतली. पण, हा एखादा पक्ष करू शकतो आणि राज्य सरकार करू शकत नाही. याचा अर्थ एकच होता की, त्यांना प्रचंड शक्ती त्याठिकाणी जमवून त्यामधून एक प्रकारचं राजकारणाला अनुकूल वातावरण महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात करायचं होतं. त्यामध्ये अशा प्रकारचा निष्काळजीपणा दाखवला गेला. त्याची किंमत काही निष्पाप लोकांना द्यावी लागली. याची चौकशी झाली पाहिजे”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?
“जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की, याची चौकशी निवृत्त न्यायाधिशांमार्फत झाली पाहिजे. जयंतरावांनी सांगितलं की उच्च न्यायालयातील आताच्या न्यायमूर्तीमार्फत झाली पाहिजे. या प्रकारचं गांभीर्य राजकारण्याचं आहे. अधिकाऱ्यांची चौकशी नेमणूक केली. तो अधिकारी स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. शेवटी तो सरकारी अधिकारी आहे. सरकारी अधिकारी आपल्या बॉससमोर… तो कितीही प्रामाणिक असला, तरी सत्यस्थिती पुढे येऊ शकणार नाही. त्यासाठी उच्च न्यायालयातील सध्याच्या न्यायमूर्तींकडेच हे काम सोपवलं पाहिजे आणि वस्तुस्थिती ही देशासमोर आणली पाहिजे”, अशी मागणी शरद पवार यांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT